UK Election: खासदार सुधा मूर्तींचे जावई गमावणार सत्ता? काय आहे राजकीय स्थिती?

रोहिणी ठोंबरे

Rishi Sunak vs Keir Starmer : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्ष असेली लेबर पार्टी ही दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ऋषी सुनक यांना ब्रिटीश निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागू शकते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहेत कीर स्टार्मर?

point

ऋषी सुनक यांच्या पक्षाला स्वीकारावा लागला पराभव

Rishi Sunak vs Keir Starmer : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्ष असेली लेबर पार्टी ही दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशात खास सुधा मूर्तींचे जावई आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ब्रिटीश निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागू शकते. तर लेबर पक्षाचे उमेदवार कीर स्टार्मर यांना आगामी निवडणुका जिंकून पंतप्रधानपद मिळण्याची दाट शक्यता आहे. (UK Election government will Change in britain Who is Keir Starmer who defeated conservatives rishi Sunak)

सत्तेत असलेल्या ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कीर स्टार्मरने एप्रिल 2020 मध्ये डाव्या विचारसरणीच्या जेरेमी कॉर्बिनकडून नेता म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी लेबर पक्षाला राजकीय केंद्रस्थानी नेले आणि त्यांच्या पक्षातील सेमेटिकवाद संपवला, त्यामुळेच त्यांचे कौतुक होत आहे. त्याच वेळी, त्यांचे समर्थक कीर स्टार्मरकडे असा एक नेता म्हणून पाहतात जो ब्रिटनला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यास पूर्णपणे सक्षम आहे. 

हेही वाचा : Team India च्या व्हिक्ट्री परेडमध्ये घडलं तरी काय? 10 जण रूग्णालयात दाखल

लेबर पार्टीच्या विजयानंतर कीर स्टार्मर देशाचे पुढील पंतप्रधान होतील असं बोललं जात आहे. दरम्यान पराभव पुढ्यात दिसू लागल्यानंतर ऋषी सुनक यांनी उद्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

कोण आहेत कीर स्टार्मर?

61 वर्षीय कीर स्टार्मर यांची कायदेशीर कारकीर्द तीन दशकांची आहे. यावेळी त्यांनी मानवाधिकारांशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. ते पेशाने वकील आहेत. कॅरिबियन आणि आफ्रिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या कैद्यांसाठीही त्यांनी वकिली केली. मॅकडोनाल्डच्या पर्यावरणीय दाव्यांवर टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याची प्रो-बोनो सेवा दिली. यामुळे त्यांच्याकडे न्यायाचे चॅम्पियन म्हणून पाहिले जाते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp