Ulhasnagar Rape Case: स्कायवॉकवर CCTV ची वानवा, प्लॅटफॉर्मवर पोलीस नाही ! रेल्वे पोलिसांकडून हतबलता व्यक्त
मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्काराच्या घटनेला २४ तास होत नाही तोच उपनगरातील उल्हासनग रेल्वे स्थानकात १४ वर्षीय मुलीवर हातोड्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असली, तरीही गुन्हा घटतेवेळी आणि घडल्यानंतर पोलीस यंत्रणेची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलीसोबत असलेल्या मुलाला आरोपीने हातोड्याचा धाक दाखवून पळवून लावलं. यानंतर तिला […]
ADVERTISEMENT

मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्काराच्या घटनेला २४ तास होत नाही तोच उपनगरातील उल्हासनग रेल्वे स्थानकात १४ वर्षीय मुलीवर हातोड्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असली, तरीही गुन्हा घटतेवेळी आणि घडल्यानंतर पोलीस यंत्रणेची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
मुलीसोबत असलेल्या मुलाला आरोपीने हातोड्याचा धाक दाखवून पळवून लावलं. यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी ज्या स्कायवॉकवर हा प्रकार घडला तिकडे सीसीटीव्हीच नसल्याचं समोर आलंय. तसेच या स्कायवॉकवर पोलिसांचा पहाराही नव्हता. या घटनेतील एका अल्पवयीन साक्षीदाराला हा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या. हद्दीची कारणं देऊन दोन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार घेण्यास नकार दिल्याचं कळतंय. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडितेलाही तक्रार नोंदवण्यासाठी असाच त्रास सहन करावा लागला.
सकाळी साडेआठ वाजता आरोपीने ठेवलेल्या ठिकाणावरुन सुटका झाल्यानंतर साडेबारा ते पाऊण वाजल्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला. गेल्या आठवडाभरापासून राज्यात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. त्यातचं रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी उल्हासनगर प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस यंत्रणेची हतबलताच बोलून दाखवली आहे.











