Amravati Case: नुपूर शर्माचं समर्थन केल्यानेच उमेश कोल्हेची हत्या: NIA
Nupur Sharma Case the radical group in Amravati wanted to avenge: अमरावती: अमरावतीमधील (Amravati) उमेश कोल्हे हत्या (Umesh Kolhe Murder) प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले असून त्यात अनेक दावे करण्यात आले आहेत. एनआयएचे म्हणणे आहे की, आरोपींनी 20 जून 2022 रोजी उमेश कोल्हेची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, या दिवशी त्याचे […]
ADVERTISEMENT
Nupur Sharma Case the radical group in Amravati wanted to avenge: अमरावती: अमरावतीमधील (Amravati) उमेश कोल्हे हत्या (Umesh Kolhe Murder) प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले असून त्यात अनेक दावे करण्यात आले आहेत. एनआयएचे म्हणणे आहे की, आरोपींनी 20 जून 2022 रोजी उमेश कोल्हेची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, या दिवशी त्याचे मेडिकल दुकान बंद असल्याने आरोपींना त्याच्यावर हल्ला करता आला नाही. मात्र, यानंतर आरोपींनी आपला कट यशस्वी करण्यासाठी रेकी टीमही तयार केली होती. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. (umesh kolhe was killed in revenge for posting a whatsapp message in support of nupur sharma nia chargesheet)
ADVERTISEMENT
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एआयए) सर्व 11 आरोपी तबलिगी जमातचे कट्टरपंथी असल्याचा दावा केला आहे. एनआयएने गेल्या आठवड्यात या प्रकरणातील 11 आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले होते आणि दावा केला होता की, प्रत्येक आरोपी तबलीगी जमातशी संबंधित आहे. उमेश कोल्हेच्या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान खान हा तबलीगी जमात आणि त्याच्या कट्टर अनुयायी असल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.
एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, उमेश कोल्हे हा आरोपी डॉ. युसूफ खानला ओळखत असल्याचे त्यांच्या तपासात समोर आले आहे. खान हा अनेकदा कोल्हे यांच्या दुकानात औषधे घेण्यासाठी येत असे. नंतर एनआयएने कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी खानला अटक केली.
हे वाचलं का?
अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मा यांच्याविषयीच्या पोस्टमुळेच,पोलिसांची माहिती
कोल्हे आणि खान एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित होते
ADVERTISEMENT
उमेश कोल्हे आणि खान हे दोघेही ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित असल्याचा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. केमिस्ट आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर अनेक लोकही या ग्रुपशी जोडले गेले होते. कोल्हे या व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन होते तर डॉ. खान हा ग्रुपचा एकमेव मुस्लिम सदस्य होता.
ADVERTISEMENT
एनआयएच्या म्हणण्यानुसार, या ग्रुपमधील कोल्हे यांच्या मेसेजमुळे डॉ.खान नाराज होता. कोल्हेने नुपूर शर्माला उघडपणे पाठिंबा देणारा मेसेज त्या ग्रुपमध्ये केला होता. त्यामुळे डॉ. खानने कोल्हेचा बदला घेण्याचा निर्धार केला. कोल्हे याच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून मुद्दाम ते सोशल मीडियावर पसरवले होते.
54 वर्षीय केमिस्ट उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी 22 जून रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आरोपपत्रात असे म्हटले आहे की, हे खुनाचे साधे प्रकरण नसून मुस्लिम कट्टरवाद्यांचा सुनियोजित गुन्हेगारी कट होता, ज्याचा उद्देश अमरावती आणि देशाच्या इतर भागातील लोकांच्या मनात भीती निर्माण करणे हा होता. कोल्हे यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्यामुळे शांतताप्रिय आणि लोकशाही देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.
उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी हत्या झाली होती. अमरावती पोलिसांनी 22 जून रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएकडून 2 जुलै रोजी पुन्हा गुन्हा दाखल केला होता.
अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या केल्यावर आरोपींनी बिर्याणी पार्टी केली, NIA ची कोर्टाला माहिती
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा हिचं समर्थन करणारा मेसेज सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला होता. यानंतर आरोपी युसूफ खान याने कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला आणि इतर आरोपींसह तो पार पाडला. या प्रकरणातील अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. ज्यामध्ये आरोपी कोल्हे यांची हत्या करताना दिसत होते. त्याआधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली.
मेडिकल स्टोअरमधून परतत असताना कोल्हेंची हत्या
उमेश कोल्हे हे दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान ही घटना घडली. उमेशचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी हे दुसऱ्या दुचाकीवरून चालले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश महिला महाविद्यालयाच्या गेटजवळ पोहोचताच मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी उमेशचा रस्ता अडवला. तर एका तरुणाने दुचाकीवरून खाली उतरून उमेशच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला उमेश रस्त्यावरच पडला होता. यानंतर संकेतने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT