धक्कादायक ! मुळा नदीकिनारी झाडावर सापडला मुलीचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह, पोलीस तपास सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– समीर शेख, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

पुणे शहराला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मुळा नदीच्या किनारी असलेल्या झाडावर, एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाची अवस्था पाहता मुलीची हत्या किमान किमान ४-५ आठवड्यापूर्वी झालेला असावी.

या घटनेबद्दल माहिती कळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्नीशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह झाडावरुन खाली उतरवला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं काम आता पोलिसांसमोर असणार आहे.

हे वाचलं का?

मुंबई : बायकोची हौस पुरवण्याच्या नादात पडल्या बेड्या, सीसीटीव्हीत हातावरील टॅटू दिसला अन्…

दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन या मृतदेहावरचे काही नमुने वैद्यकीय चाचणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या मुलीचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल हातात आल्यानंतर या मुलीची ओळख आणि तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दरम्यान मुलीची ओळख पटवण्यासाठी आजुबाजूच्या परिसरात दाखल झालेल्या मिसींग केसचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू हा मृतदेह नदी किनारी असलेल्या झाडावर आला कसा याबद्दल आता शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

खळबळजनक घटना : तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT