आता कुठे गेले अंधभक्त? उद्धव ठाकरेंचं कौतुक करत सुब्रमण्यम स्वामींचा केंद्राला टोला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना हाताळणीबाबत मुंबई आणि पुणे मॉडेलचं कौतुक केलं आहे. त्यावरून आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. तसंच पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. काय म्हणालेत सुब्रण्यम स्वामी ? आजच मोदी सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. कोरोनाची परिस्थिती मुंबईने चांगल्या रितीने हाताळल्याचं म्हटलं […]
ADVERTISEMENT

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना हाताळणीबाबत मुंबई आणि पुणे मॉडेलचं कौतुक केलं आहे. त्यावरून आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. तसंच पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
काय म्हणालेत सुब्रण्यम स्वामी ?
आजच मोदी सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. कोरोनाची परिस्थिती मुंबईने चांगल्या रितीने हाताळल्याचं म्हटलं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. कोरोना परिस्थितीच्या बाबतीत त्यांचा आदर्श घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सर्वात आधी मी ही गोष्ट म्हटली होती. त्यावेळी मला अनेकांनी नावं ठेवली.. आता केंद्रानेच उद्धव ठाकरेंचं चांगलं काम मान्य केलं आहे. आता अंध आणि गंध भक्त कुठे गेले? घाबरलेल्या कोल्ह्यांसारखे गायब झाले का? या आशयाचं ट्विट स्वामी यांनी केलं आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही का होतायत मृत्यू?