Nitin Gadkari पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज, मत द्यायचं तर द्या नाहीतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशात त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज आहोत असे संकेत दिले आहेत. पुढच्या निवडणुकीत मी कटआऊट लावणार नाही, कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नाही. निवडणुकीत मत द्यायचं तर द्या नाहीतर नका देऊ असं म्हटलं तरीही लोक मत देतील कारण लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुंबईत हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

चांगलं काम करणारे लोक निवडून येतातच

मुंबईतल्या अंधेरीमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. या भाषणात नितीन गडकरी म्हणाले की लोक ज्यांना निवडून द्यायचं त्यांना निवडून देतातच. लोकांना चांगलं काम करणारा नेता पाहिजे. मी आयुष्यात कधीही गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागतला किंवा पोहचवायला एकही माणूस येत नाही. यापुढेही लावणार नाही असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी यावेळी म्हणाले मुंबई-पुणे महामार्ग बांधला तेव्हा लगेच टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती. पण तुमचा वेळ वाचला, वाहतूक कोंडी कमी झाली, पेट्रोल-डिझेलची बचत झाली मग टोलला पैसे द्यायला काय हरकत आहे असा मुद्दा मी मांडला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंक यासाठी चांगली सेवा दिल्याने लोक पैसे काढण्यास तयार होतात. आता लवकरच नरीमन पॉईंट ते वसई असा प्रवास तुम्ही १५ मिनिटात करणार आहात त्यासाठी काम सुरू आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आत्तापर्यंत ४५ लाख कोटींची कामं झाली आहेत

आत्तापर्यंत ४५ लाख कोटींची काम आपण केली आहेत. कामांसाठी निविदेसाठी आम्ही ई टेंडरिंग प्रक्रिया राबवत आहोत. तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे हे आम्ही पाहतो आहोत असंही गडकरींनी म्हटलं आहे. लोकांना नगरपालिका, महापालिकेत येण्याची आवश्यकता भासली पाहिजे, नागरिकांची कामं मोबाइलवर झाली पाहिजेत असंही गडकरी यांनी भाषणात म्हटलं आहे.

मी काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात जुहू आणि अंधेरी भागात पाणी साठत असल्याचं सांगितलं. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन हे सगळं जर नगरपालिका आणि महापालिकांना दिलं तर हा प्रश्न राहणार नाही. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही ते कामं कशी करतील असाही प्रश्न गडकरींनी विचारला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT