Terrorism: साखळी बॉम्बस्फोटाची तयारी झालेली पूर्ण, ATS ने वेळीच आवळल्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या

मुंबई तक

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधील (Lucknow) काकोरी येथून अटक करण्यात आलेल्या अल-कायदाचे दोन संशयित दहशतवादी ( terror suspect) लखनऊसह उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट (serial blasts) घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. संशयित दहशतवाद्यांनी एका मोठ्या बॉम्बस्फोटाची योजना आखली होती. यूपी एटीएसने (ATS) ताब्यात घेतलेल्या या दोन संशयितांकडून प्रेशर कुकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधील (Lucknow) काकोरी येथून अटक करण्यात आलेल्या अल-कायदाचे दोन संशयित दहशतवादी ( terror suspect) लखनऊसह उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट (serial blasts) घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.

संशयित दहशतवाद्यांनी एका मोठ्या बॉम्बस्फोटाची योजना आखली होती. यूपी एटीएसने (ATS) ताब्यात घेतलेल्या या दोन संशयितांकडून प्रेशर कुकर बॉम्बही सापडला आहे. या बॉम्बची तीव्रता ही खूपच होती. याशिवाय काही जिवंत बॉम्ब देखील जप्त करण्यात आले आहेत.

यूपी एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, ‘उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याचे त्यांचे नियोजन होते. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीरशी संबंध असल्याची माहिती मिळते आहे. हे स्लीपर सेल्स होते परंतु आता ते सक्रियपणे काम करत होते.’

‘हे दहशतवादी आज किंवा उद्या लखनौ आणि उत्तर प्रदेशात स्फोट करणार होते. त्यांच्याकडून बरीच स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या लोकांना मोठा धमाका करायचा होता. बरेच दिवसांपासून यासाठी त्यांचं नियोजन चालू होतं. अद्याप यांच्यासारखे इतरही काही जण असू शकतात. त्यामुळे आता सतत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारणं चालू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp