Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून महिला आमदार भडकल्या, विधानसभेत गोंधळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sheetal Mhatre Virla Video, Maharashtra Budget Session : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. आमदार यामिनी जाधव, आमदार मनिषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधण्याची मागणी केली. या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. (uproar in Maharashtra Budget Session over Sheetal Mhatre Viral Video Case)

ADVERTISEMENT

माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील राजकारणाचा पारा चढला. हा व्हिडीओ मॉर्फ्ड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. दरम्यान, हा मुद्दा शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत मांडला.

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावरून विधानसभेत काय घडलं?

आमदार यामिनी जाधव यांनी मुद्दा उपस्थित करताना सभागृहात सांगितलं की, एका रॅलीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका प्रतिष्ठित महिलेच्या बाबतीत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फिंग केली गेली आहे. या प्रकरणावर कधी कारवाई होणार? ती विवाहित महिला आहे, तिचं आयुष्य बरबाद होईल. ज्याने कुणी हे केलं, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी यामिनी जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

हे वाचलं का?

त्यानंतर आमदार मनिषा चौधरी यांनीही हा मुद्दा मांडला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. पहिल्यांदा व्हिडीओ कुणी मॉर्फ्ड केला त्याला शोधून काढावं. कुठलाही माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याबद्दल असं होऊ शकतं. त्या कार्यक्रमाला मी हजर होते. एखादा डोकेफिरू माणूस नवरा असेल, त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो.”

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

“पुरुष आमदाराला त्यांची बायको संसारातून बाहेर काढू शकते. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर काय कारवाई करणार? युवासेनेच्या वार्डच्या अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली. याचा मास्टरमाईंड कोण आहे, तो शोधून काढा. मला या प्रकरणाची चौकशी हवीये. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. यामधील संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत”, अशी मागणी करत मनिषा चौधरी आक्रमक झाल्या.

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा

ADVERTISEMENT

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची एसआयटी चौकशी करा -भारती लव्हेकर

भारती लव्हेकर यांनीही यावर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “सर्वच राजकीय पक्षांनी संवेदनशीलपणेच नाही, तर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. तुमच्या राजकारणासाठी महिलांचा वापर करायला, त्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत. हे अतिशय वाईट आहे. माझी मागणी आहे की, याची आपण एसआयटी चौकशी करा आणि यांचे सगळ्यांचे मोबाईल जप्त करा, म्हणजे सर्व माहिती कळेल. ज्या कंपन्या राजकीय पक्षांचं अशा पद्धतीने काम करत आहेत, त्या कंपन्यांची चौकशी लावा,” अशी मागणी लव्हेकर यांनी केली.

अजित पवार म्हणाले, “महिला आमदारांनी फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. व्हायरल व्हिडीओबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राजकारण असो कुठलंही क्षेत्र, आपलं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे यात कुणी मास्टरमाईंड असेल, तर याची चौकशी झाली पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे, हे सभागृहालाही कळली पाहिजे.

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओ प्रकरणात तीन जण ताब्यात; एक काँग्रेसशी संबंधित?

अमित साटम म्हणाले, “या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे. एसआयटी चौकशी झाली पाहिजे, पण एसआयटी फक्त नेमून ठेवली नाही पाहिजे. हे यासाठी सांगतोय की मागच्या अधिवेशनात दिशा सालियन हत्येसंदर्भात एसआयटी घोषित केली होती. त्या एसआयटीचा तपास कुठंपर्यंत आला? त्यात काय निष्पन्न झालं, हे समोर आलं पाहिजे. या प्रकरणातही एसआयटी नेमताना कालावधी ठरवून दिला पाहिजे”, अशी मागणी साटम यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शासनाला दिले निर्देश

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “यामिनी जाधव यांनी जी माहिती मांडली आणि सभागृहातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मी असे निर्देश देत आहे की, शासनाने आज कामकाज संपण्यापूर्वी या प्रकरणावर निवेदन करावं.” त्यामुळे सरकार काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT