‘उर्फी’वरून भिडल्या! रुपाली चाकणकर चित्रा वाघांना म्हणाल्या ‘गांधारी’
उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं होतं. चित्रा वाघांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आयोगाला सवाल करणाऱ्या चित्रा वाघांवर चाकणकरांनी गांधारी म्हणत पलटवार केलाय. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या […]
ADVERTISEMENT

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं होतं. चित्रा वाघांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आयोगाला सवाल करणाऱ्या चित्रा वाघांवर चाकणकरांनी गांधारी म्हणत पलटवार केलाय.
उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणीही केलीये. त्यामुळे उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
आता या वादात चित्रा वाघांनी महिला आयोगाला सवाल केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी महिला नेत्या समोरा-समोर आल्यात.
उर्फीच्या कपड्यांचा वाद पेटला! रुपाली चाकणकर चित्रा वाघांच्या ‘रडार’वर