Tirath Singh Rawat: उत्तराखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा
देहरादून: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आज (2 जुलै) एक मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Chief Minister Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (resignation) दिला. चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी राजधानी दिल्लीत भाजपचे […]
ADVERTISEMENT
देहरादून: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आज (2 जुलै) एक मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Chief Minister Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (resignation) दिला.
ADVERTISEMENT
चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी राजधानी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यावेळीच त्यांनी आपली राजीनामा देण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
मार्च 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या रावत यांनी राजीनाम्याचं कारण हे घटनात्मक संकट असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर सर्वांचे लक्ष पुन्हा उत्तराखंडकडे लागले आहे. उत्तराखंड भाजपने शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.
हे वाचलं का?
…म्हणून तीरथ सिंह रावत यांना द्यावा लागला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
तीरथ सिंह रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘कलम 164-A नुसार मुख्यमंत्री झाल्यावर 6 महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेचे सदस्य होणं क्रमप्राप्त होतं. पण कलम 151 मध्ये असे नमूद केले आहे की जर विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर त्या राज्यात पोटनिवडणूक होऊ शकत नाही. यामुळे उत्तराखंडमध्ये घटनात्मक पेच उद्भवू नये म्हणून मी मला माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा आहे.’
ADVERTISEMENT
“Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat submitted his resignation letter from the post of Chief Minister at Raj Bhawan,” tweets Uttarakhand Governor Baby Rani Maurya pic.twitter.com/XkHE0nByGF
— ANI (@ANI) July 2, 2021
उत्तर प्रदेशप्रमाणेच पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, यामुळेच मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्ली येथे बोलावलं होतं. त्यांच्याखेरीज भाजपचे दोन ज्येष्ठ नेते सतपाल महाराज आणि धनसिंग रावत यांनाही दिल्ली येथे बोलावण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
दुपारी तीन वाजता बैठक बोलावली
शनिवारी दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक पक्ष मुख्यालयात होणार आहे. भाजपचे मीडिया प्रभारी मनवीरसिंग चौहान यांनी सांगितले की, शनिवारी होणाऱ्या या बैठकीचे नेतृत्व उत्तराखंड भाजपा अध्यक्ष मदन कौशिक हे करणार आहेत.
सर्व आमदारांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शनिवारी देहरादूनमध्ये राज्यातील सर्व भाजप आमदारांनी उपस्थित रहावे असे निर्देश पक्षाने दिले आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक केले गेले आहेत. जे देहरादूनला जातील.
Tirath Singh Rawat: उत्तराखंडच्या नव्या CMचं महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य, तुफान टीका
‘या’ दोन नेत्यांची नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत
तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासाठी आताच्या घडीला दोन नावांवर चर्चा सुरु आहे. सतपाल सिंह आणि धनसिंग रावत अशी दोन नेत्यांच्या नावावर सध्या चर्चा सुरु आहे. सतपाल सिंह हे राज्यातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. तर धनसिंह यांचे नाव गेल्या वेळीही चर्चेत होते पण त्यांच्याआधी तीरथ सिंह यांना पसंती देण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT