धक्कादायक ! धुळ्यात मृत व्यक्तीच्या नावाने कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस जारी

मुंबई तक

एकीकडे देशभरात कोरोना लसीचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला जात असताना, हा टप्पा पूर्ण करण्यासाठी झालेले घोळही समोर येत आहेत. धुळ्यात चक्क मृत व्यक्तीच्या नावाने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचं प्रमाणपत्र जाहीर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बन्सीलाल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकीकडे देशभरात कोरोना लसीचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला जात असताना, हा टप्पा पूर्ण करण्यासाठी झालेले घोळही समोर येत आहेत. धुळ्यात चक्क मृत व्यक्तीच्या नावाने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचं प्रमाणपत्र जाहीर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बन्सीलाल धराळे या मृत व्यक्तीच्या नावावर १९ ऑक्टोबरला कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे ६ एप्रिल रोजी बन्सीलाल यांचा अकस्मात मृत्यू झाला होता. १० मार्चला बन्सीलाल यांनी पहिला डोस घेतला होता. परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही लसीचा दुसरा डोसचं प्रमाणपत्र आल्यामुळे त्यांच्या परिवाराला धक्काच बसला.

दरम्यान प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतची माहिती आल्यानंतर घडलेला प्रकार हा ऑपरेटरच्या चुकीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. बन्सीलाल यांचा मुलगा विनोदला मोबाईलवर १९ ऑक्टोबरला दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला. विनोद यांनी हे प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील यांचा मोबाईल नंबर टाकलेला दिसला. ही बाब लक्षात आल्यानंतर ऑपरेटरने चुकीचा नंबर टाकल्यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याने व्हेरिफिकेशन न करता रजिस्ट्रेशन केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं.

लसीकरणाचा उच्चांक! भारताने लसीकरणात ओलांडला 100 कोटी डोसचा टप्पा

प्राथमिक आरोग्य केंद्राने या प्रकरणात आपली चूक मान्य केली असून वरिष्ठ कार्यालयात झालेली नोंद रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp