उपराष्ट्रपती निवडणूक २०२२ : धनकड की, अल्वा… उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार?
राष्ट्रपती निवडणुकीचं मतदान पार पडत नाही तोच उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय बैठका सुरू झाल्यात. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपापासून दूर गेलेल्या शिवसेनेनं आदिवासी समुदायाचा चेहरा असलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या पदरात मतं टाकली. आता उपराष्ट्रपती निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने जगदीप धनकड यांना […]
ADVERTISEMENT
राष्ट्रपती निवडणुकीचं मतदान पार पडत नाही तोच उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय बैठका सुरू झाल्यात. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपापासून दूर गेलेल्या शिवसेनेनं आदिवासी समुदायाचा चेहरा असलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या पदरात मतं टाकली. आता उपराष्ट्रपती निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
ADVERTISEMENT
उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे, तर युपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धनकड की अल्वा? उद्धव ठाकरे कुणाला देणार पाठिंबा?
‘राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी गटातील उमेदवारांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची परंपरा आहे’, असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातील खासदारांनी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती, असं बोललं गेलं.
हे वाचलं का?
बहुसंख्य खासदारांनी भाजपने दिलेल्या उमेदवार मुर्मु यांना पाठिंबा देण्याबद्दल बैठकीत भूमिका घेतली होती. आमदारांच्या बंडानंतर काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावरून विधिमंडळापाठोपाठ संसदेतही पक्षफुट नको, अशा भूमिकेतून शिवसेनेनं मुर्मु यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं.
Sanjay Raut : फुटीर गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सिझन 2
ADVERTISEMENT
उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना काय करणार?
राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीएतील घटक पक्ष आणि यूपीएमध्ये नसलेले मात्र विरोधी बाकांवरील पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकांना शिव सेनेचे नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई हे शिवसेनेच्या वतीने उपस्थित होते.
ADVERTISEMENT
उपराष्ट्रपती पदासाठी युपीएने उमेदवार निवडीसाठी बैठक घेतली त्यावेळीही संजय राऊत उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेना अल्वा यांना पाठिंबा देणार की धनकड असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
एकनाथ शिंदेंची प्रतिशिवसेना, जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत उचललं महत्त्वाचं पाऊल
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला दोन आठवडे उरलेत. पण त्यापूर्वीच शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेचे13 खासदार ऑनलाइन उपस्थित होते, अशी माहिती समोर आलीये. त्यामुळे पुन्हा खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली, तर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT