डोंबिवली: ‘तुमचे 50 हजार नको, मी देतो तुम्हाला 50 हजार’, मंत्री आठवलेंना चारचौघात सुनावलं!

मुंबई तक

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली जवळील संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी आणि आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे संदप या गावी आले होते. पण यावेळी मंत्री आठवलेंना पीडित कुटुंबीयांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली जवळील संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी आणि आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे संदप या गावी आले होते. पण यावेळी मंत्री आठवलेंना पीडित कुटुंबीयांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे या ठिकाणाहून काही वेळातच त्यांनी काढता पाय घेतला.

डोंबिवलीमधील संदप गावातील गायकवाड कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ माजली होती. याच कुटुंबाला भेटून जेव्हा रामदास आठवले यांनी 50 रुपयांची मदत जाहीर केली तेव्हा पीडित कुटुंबीयांचा अक्षरश: उद्रेक झाला.

‘मी देतो तुम्हाला 50 हजार..’

‘प्रशासन गेली पाच वर्ष पाण्याचा बंदोबस्त करतोय का? मला नको तुमचे 50 हजार.. मी देतो तुम्हाला 50 हजार..’, असं गायकवाड कुटुंबातील एका व्यक्तीने रामदास आठवले यांना सर्वांसमक्षच सुनावलं. पण यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ बाजूला घेत फार काही बोलू दिलं आहे.

हे वाचलं का?