Mumbai: मानवी रक्ताला चटावलेला बिबट्या, महिलेवर भयंकर हल्ला (VIDEO)
मुंबई: माणसाच्या रक्ताला चटावलेल्या एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव येथील आरे परिसरात एका मध्यमवयीन महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. याच हल्ल्याचा अतिशय धक्कादायक व्हीडिओ आता समोर आला आहे. महिला आणि बिबट्यामधील झटापटीचा हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. ज्यात बिबट्याने मध्यमवयीन महिलेवर अचानक मागून हल्ला केला. पण महिलेने आपल्या हातातील काठीने बिबट्याचा हल्ला परतवून लागला. ज्यामुळे बिबट्याने […]
ADVERTISEMENT
मुंबई: माणसाच्या रक्ताला चटावलेल्या एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव येथील आरे परिसरात एका मध्यमवयीन महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. याच हल्ल्याचा अतिशय धक्कादायक व्हीडिओ आता समोर आला आहे. महिला आणि बिबट्यामधील झटापटीचा हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.
ADVERTISEMENT
ज्यात बिबट्याने मध्यमवयीन महिलेवर अचानक मागून हल्ला केला. पण महिलेने आपल्या हातातील काठीने बिबट्याचा हल्ला परतवून लागला. ज्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. दरम्यान, हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ही घटना बुधवारी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
हे वाचलं का?
बिबट्याने महिलेवर कशाप्रकारे हल्ला केला हे आपल्याला व्हीडिओमध्ये पाहायला मिळतं आहे. सुरुवातीला महिला काठीच्या मदतीने चालत-चालत घराबाहेर आली आणि मग घराच्याच शेजारी असलेल्या एका ओट्यावर ती बसली. पण तेवढ्यात त्याच बाजूला दबा धरुन बसलेल्या एका बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्लाने ही महिला खाली पडली. पण तात्काळ स्वत:ला सावरत तिने हातातील काठीने बिबट्यावर प्रहार केला. महिलेकडून झालेल्या या प्रतिहल्ल्याने बिबट्या देखील काही क्षण भांबावला. पण त्याने पुन्हा एकदा महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने आपल्या हातातील काठी उगारल्याने बिबट्या तात्काळ तिथून काढता पाय घेतला.
ADVERTISEMENT
मात्र, बिबट्याच्या या हल्ल्यात महिला मात्र बरीच जखमी झाली झाली आहे. पण सुदैवाने तिला गंभीर इजा झाली नाही. पण या संपूर्ण प्रकाराने महिलेला प्रचंड धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा महिलेने प्रचंड आरडाओरड केला. ज्यामुळे आजूबाजूच्या घरातील अनेक जण धावत बाहेर आले. पण तोपर्यंत बिबट्याने तेथून धूम ठोकली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्यातून महिला सुखरुपपणे बचावली असून तिच्यावर जोगेश्वरी पूर्वी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. या 55 वर्षीय महिलेचं नाव निर्मला देवी सिंह असं असल्याचं समजतं आहे.
आरे परिसरात वारंवार बिबट्याकडून हल्ला
-
साधारण महिन्याभरात सहाहून अधिक जणांवर या बिबट्याने हल्ला केला आहे. पण सुदैवाने लोकं या बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले आहेत.
-
बिबट्याने या हल्ल्याची सुरुवात सगळ्यात आधी एका महिलेपासून केली होती. युनिट 32 येथे या बिबट्याने महिलेवर हल्ला केला होता.
-
त्यानंतर आरे रोडवर एका माणसावर त्याने हल्ला केला होता.
-
काही दिवसांपूर्वी तपेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मांजरीवर देखील हल्ला केला होता.
-
युनिट नंबर 30 मध्ये याच बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला.
-
हा बिबट्या एवढ्यावरही थांबला नाही त्याने एका 4 वर्षाच्या मुलावर हल्ला केला ज्यामध्ये मुलगा गंभीररित्या जखमी झाला होता.
-
तर तीनच दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या मुलावर बिबट्याने पुन्हा हल्ला चढवला.
-
काल (29 सप्टेंबर) निर्मला देवी यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. पण नशीब बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या.
१२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगलीत बिबट्या जेरबंद
दरम्यान, मानवी रक्ताला चटावलेल्या या बिबट्याचा प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता येथील नागरिक करु लागले आहेत. कारण बिबट्याच्या दहशतीने येथील नागरिकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT