पंकजां मुंडेंना पुन्हा डच्चू! भाजपकडून दरेकर, लाड यांच्यासह पाच जणांना उमेदवारी
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातील नेतृत्वाकडून डावललं जात असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असतानाच भाजपकडून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली असून, भाजपने पाच जणांना उमेदवारी दिलीये. यात पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. उद्या म्हणजेच ९ जून उमेदवारी […]
ADVERTISEMENT

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातील नेतृत्वाकडून डावललं जात असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असतानाच भाजपकडून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली असून, भाजपने पाच जणांना उमेदवारी दिलीये. यात पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही.
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. उद्या म्हणजेच ९ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, भाजपने आज पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीये. यात पंकजा मुंडे यांच्याबरोबरच चित्रा वाघ यांना वगळण्यात आलं आहे.
विधान परिषद निवडणूक : भाजपमध्ये आयाराम-निष्ठावंतांमध्ये रस्सीखेच, पंकजा मुंडेंचं काय होणार?
भाजपकडून सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.