Vidhan Parishad Election: भाजपने १३४ मतं नेमकी कशी मिळवली? कुणाची किती मतं फुटली?

मुंबई तक

सोमवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीचा धुरळा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीत भाजपने मैदान मारलं आहे. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजपकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मतं नसतानाही एकूण १३४ मतं मिळवत भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोन्ही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

सोमवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीचा धुरळा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीत भाजपने मैदान मारलं आहे. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजपकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मतं नसतानाही एकूण १३४ मतं मिळवत भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोन्ही उमेदवारांपैकी चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आणि भाई जगताप जिंकले.

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी रणनीती या निवडणुकीसाठी कामाला आली यात काहीही शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले, शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची मतं फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत (RajyaSabha Election) भाजपला १२३ मतं मिळाली होती तर विधान परिषद निवडणुकीत भाजपला १३४ मतं मिळाली.

काँग्रेसची पहिल्या पसंतीची मतं हंडोरे यांना द्यायचं ठरलं असतानाही त्यांना पहिल्या फेरीत विजयी होता आलं नाही. पहिल्या फेरीत चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली तर भाई जगताप यांना २० मतं मिळाली.

कुणाची किती मतं फुटली?