शिवसेनेचे आमदार हॉटेल ‘बंद’, दोघांच्या मतांवर प्रश्नचिन्ह; विधान परिषदेसाठी कुणाचं पारडं जड?
विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे. […]
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे.
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्यानं राजकीय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. स्वतः पक्षातील आमदारांबरोबरच समर्थन देणाऱ्या आमदारांची मतं आपल्यालाच मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून मतं फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे. शिवसेनेनं आपले आमदार पवईतील हॉटेल रेनसाँमध्ये ठेवले आहेत. हे आमदार २० जून पर्यंत हॉटेलमध्ये राहणार असून, मतदानासाठीच बाहेर पडणार आहेत.
हे वाचलं का?
विधान परिषद निवडणूक : आघाडीतच कुरघोड्या! शिवसेना समर्थक आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फोन
शुक्रवारी (१७ जून) शिवसेनेनं आपल्या आमदारांची आणि पाठिंबा असणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई याबाबत बोलताना म्हणाले की, “विधान परिषदेसाठी २० जूनला मतदान होणार असून, मतदान करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल आमदारांना माहिती देण्यात आली,” असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार
ADVERTISEMENT
विधान परिषदेच्या १० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडे ४ उमेदवार निवडून येतील इतका मतांचा आकडा आहे, पण भाजपनं ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेसलाही दुसरा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी बाहेरच्या मतांची गरज आहे.
‘हे अजितदादांच्या विरोधातच षडयंत्र’, फडणवीसांनी दादांना चुचकारलं, नेमका इशारा कोणाकडे?
भाजपने प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं सचिन अहिर, आमशा पाडवी यांना, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
मलिक-देशमुख यांच्या मतांचं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नबाव मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेत मतदान करता आलं नाही. त्यानंतर आता त्यांना विधान परिषदेत मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न कायम आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मलिक-देशमुख यांची मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दोघे उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, तिथे काय होणार हे अद्याप अनुत्तरित आहे. दोघांनाही मतदान करता आलं नाही, तर विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा २६ वर येईल.
२६ च्या कोट्यानुसार कुणाला किती मतांची गरज?
मलिक-देशमुखांनी मतदान केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्ष मतांची गरज असणार आहे. राष्ट्रवादीला जास्तीच्या एका मतांची गरज असणार आहे. तर शिवसेनेची तीन मतं जास्तीची असणार आहे. त्याचबरोबर शिवसेना पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची (७) मते शिल्लक असणार आहेत. तर आघाडीतील काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ८ मतांची गरज असणार आहे.
या सुत्रांनुसार चार उमेदवार निवडून भाजपकडे ९ मते शिल्लक राहतात. त्यामुळे पाचव्या जागेसाठी भाजपला अधिकच्या मतांची तडजोड करावी लागणार आहे. भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी १३० मतं आवश्यक आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. तसेच आता गुप्त मतदान असल्यानं बाहेरून तेवढी मते मिळू शकतात, असं भाजपकडून सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT