Vidhan Parishad Election: दिग्गजांचा पत्ता कट, कोण आहेत उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप या निवडणुकीत पाच जागा लढवणार आहे. भाजपने राज्यातील दिग्गजांना डावलत दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पाच उमेदवारांपैकी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नवीन चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय कोण आहेत हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

नगरसेवक ते आमदार

उमा खापरे (Uma Khapre) या भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये त्यांनी दोन वेळा नगरसेवक पद भूषवले आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपमध्ये महिला प्रदेश सचिवासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. नुकतंच उमा खापरे यांनी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर जहरी टीका केली होती. नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोपू असे जाहीर वक्तव्य उमा खापरे यांनी केले होते. तेव्हापासून त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या.

हे वाचलं का?

उमा खापरेंचा थोडक्यात परिचय

भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष.

ADVERTISEMENT

– महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह विविध पद भूषवली.

ADVERTISEMENT

– भाजपच्या निष्ठावंत आणि जुन्या नेत्या म्हणून त्यांची ओळख.

– 1997 ते 2007 महानगर पालिका नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

– 1998 ते 2001 कोषाध्यक्ष.

– 2001 ते 2003 त्या महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.

– 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव.

– 2002 ते 20011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस.

– 2017 ते 2020 सोलापूर च्या प्रभारी.

– 2019 ते 2022 महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा अध्यक्षा.

फडणवीसांचे ओएसडी ते आमदार

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत होती. परंतु त्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे. भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांचे ओएसडी होते. भाजपच्या अनेक आंदोलनात त्याचबरोबर शिवसेनेवरती टीका करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले जाते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे ते प्रमुख होते.

मुंडे, वाघांसोबत मित्र पक्षाच्या नेत्यांचा पत्ता कट

भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नावं जाहीर होण्याअगोदर पंकजा मुंडेंचे नाव येईल अशी चर्चा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ”केंद्राने काहीतरी विचार करुन ही यादी जाहीर केली असेल, त्यांच्याबाबतीत काहीतरी वेगळा विचार केला असेल.” मुंडे आणि वाघांसोबतच मित्र पक्षाच्या सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांनाही उमेदवारी नाकारली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT