अमरावतीत झालेली दंगल राज्य सरकार पुरस्कृत – किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

त्रिपुरातील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणात नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव यासारख्या शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती शहराला या दंगलीचा जोरदार फटका बसला, ज्यात सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. या दंगलीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावतीत झालेली दंगल ही राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

“१२ नोव्हेंबर रोजी ज्या पद्धतीने लोकांना भडकवलं गेलं, दगडफेक झाली, मारपीट झाली हे सर्व कसं झालं? अजुनही ठाकरे सरकारने या दंगलीचा चौकशी अहवाल सार्वजनिक का केला नाही? याचा अर्थ असाच होतो की ही दंगल राज्य सरकार पुरस्कृत होती”, बुलढाण्यातील चिखली शहरात असताना सोमय्या पत्रकारांशी बोलत होते.

१२ तारखेला अमरावतीत निघालेला मोर्चा हा शरद पवारांनी आयोजित केला होता. १९९२-९३ साली झालेल्या दंगलीचं मॉडेल यंदाच्या ठाकरे-पवार सरकारने राबवलं आहे. फरक फक्त इतकाच आहे की तेव्हाचे ठाकरे आणि आताच्या ठाकरेंमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले होते, त्यांनी सांगितलं होतं की एकही हिंदू मार खाणार नाही. त्यानंतर आज हे एक ठाकरे आहेत जे दोन्ही हातात हिरवे झेंडे घेऊन मैदानात उतरल्याची घणाघाती टीका सोमय्यांनी केली.

हे वाचलं का?

अमरावतीत झालेल्या दंगलीनंतर जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत संचारबंदी लागू केली होती. कालांतराने तणावाचं वातावरण कमी झाल्यानंतर ही संचारबंदी उठवण्यात आली.

दंगलीनंतर अमरावतीत बंधुभावाचे रंग, मुस्लीम व्यक्तींचा देवळासाठी पहारा…हिंदूंची दर्ग्यात गस्त

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT