स्वच्छता अभियान : सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि खानापूर नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्याने आपला वरचष्मा राखला आहे. स्वच्छता सर्वेक्षणात विटा आणि खानापूर या दोन शहरांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मान झाला आहे. या स्पर्धेत विट्याने संपूर्ण देशात पहिला तर खानापूरने राज्यात पहिला आणि देशात २२ वा नंबर पटकावला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

ADVERTISEMENT

या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नंबर पटकाविलेल्या पहिल्या २२ शहरांचा २० नोव्हें बर रोजी राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मान सोहळा पार पडला. यांत विटा शहर हे स्वच्छतेत देशा मध्ये अव्वल ठरले असून लोणावळा दुसरे तर सासवड शहर तिसरे आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही बाब कौतुकाचे ठरली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार करता खानापूर आणि विटा या दोन शहराचे हे उज्वल यश जिल्हा वासियांच्या दृष्टीने अभिमानाचे ठरले आहे. यावर्षी च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशाभरातील ४ हजार ३२० शहरांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध निकषांवर शहराचे मूल्यांकन करण्यात आले.

यामध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी , व सार्वजनिक भागाची नियमित स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृति, 3R प्रणाली, १००टक्के कचरा वर्गीकरण, कलेक्शन व प्रोसेसिंग, होम कम्पोस्टिंग, नाले- तलाव व्यवस्थापन व स्वच्छता, अशा अनेक स्वच्छताविषयक या घटकांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

हे सर्व घटक शहराच्या सर्वांगीण विकासाला पोषक असून याद्वारे संपूर्ण शहराचा शाश्वत विकास होण्यास मदत होते. हे सगळे निकष विटा शहराने पूर्ण केलेत शिवाय कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहर ODF ++ आदी नामांकने देखील मिळवली आहेत. शहर कचरा कुंडी मुक्त, कचरा मुक्त, प्लास्टिक मुक्त व हागणदारीमुक्त झालेली आहेत.

या स्पर्धेत सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीही पारितोषिके दिली आहेत. पुरस्कार प्राप्त नगरपालिकातील प्रत्येकी चार प्रतिनिधींना व्यासपीठावर जाण्याची संधी मिळणार आहे. विटा पालिकेच्यावतीने स्वच्छते चे ब्रँड ॲम्बेसिडर वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, सफाई कामगार शांताबाई हत्तेकर आणि मुख्याधिकारी अतुल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT