वर्धा: 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार, 13 वर्षीय मुलगी गरोदर; गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला अटक
सुरेन्द्र रामटेके, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरुन वर्धा पोलिसांनी नामांकित कदम हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर रेखा कदम यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेमुळे वर्ध्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आली असून अन्य […]
ADVERTISEMENT

सुरेन्द्र रामटेके, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरुन वर्धा पोलिसांनी नामांकित कदम हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर रेखा कदम यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेमुळे वर्ध्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आली असून अन्य दोन आरोपीसह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले होते. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने मुलीला गर्भधारणा झाली.
यासंबंधात पीडित मुलीच्या आईवडिलांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मुलीची बदनामी होईल असे धमकावून तिचा गर्भपात करून घेण्याचा अट्टाहास केला. त्यानंतर डॉक्टरला तीस हजार रुपयात देऊन मुलीचा गर्भपात करुन घेण्यात आला. असे तक्रारीत म्हटलं आहे.