अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी; 11 लाख घेऊनही कार्यक्रमाला अनुपस्थित
अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात मुरादाबाद येथील ACJM-5 न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलीवूड अभिनेत्रीविरोधाच जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता अमिषा पटेलला 20 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी ACJM-5 च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर 11 लाख अॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमाला […]
ADVERTISEMENT
अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात मुरादाबाद येथील ACJM-5 न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलीवूड अभिनेत्रीविरोधाच जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता अमिषा पटेलला 20 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी ACJM-5 च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर 11 लाख अॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री अमिषा पटेलवर नेमका काय आरोप?
अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर 11 लाख अॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमात न आल्याचा आरोप आहे. एका लग्न संमारंभाला उपस्थित राहून त्यांना नृत्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पैसे घेऊनही अमिषा या कार्यक्रमाला आली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवनकुमार वर्मा यांनी अमिषा पटेलच्या विरोधात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे आयपीसीच्या कलम 120-बी, ४०६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अमिषा पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉरंट जारी करूनही अमिषा पटेल कोणतेही ठोस कारण न देता न्यायालयात हजर राहिली नाही म्हणून आता न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
हे वाचलं का?
अमिषा पटेल आगाऊ पैसे घेऊनही कार्यक्रमाला अनुपस्थित
अमिषा पटेल विरोधात गुन्हा दाखल करणारे इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा म्हणाले की त्यांनी कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अमिषाला आगाऊ दिले होते, त्याचबरोबर महागड्या हॉटेलमध्ये बुकींग करुन दिले होते. दिल्लीमध्ये राहण्याचा सर्व खर्चही दिला होता. मात्र अमिषाने दिल्लीत येऊनही आपण दिल्लीपासून दूर असल्याचे कारण दिले आणि कार्यक्रमाला अनुपस्थीत राहिली.
अमिषा याआधीही अनेक वादात सापडली
अमिषा पटेल वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चेक बाऊन्स झाल्यामुळे भोपाळ कोर्टात तिच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT