Dasara Melava: आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण चर्चेत आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. एकीकडे उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्यांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांना कायदा चांगला कळतो. हा काही मी टोमणा मारलेला नाहीये. सभ्य गृहस्थ आहेत देवेंद्र फडणवीस. ते म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. पण मी चांगलं बोलतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते, मी पुन्हा येईन, दीड दिवस आले. दीड दिवसात विसर्जन झाले आणि मनावर दगड ठेवून पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून आलेत.

आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची

पुन्हा आल्यानंतर आज ते म्हणताहेत की कायद्याच्या चौकटीत राहून बोला. नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. कायदा तुम्हालाच कळतो, असं नाहीये. आम्हालाही कळतो. कायदा पाळायचा असेल, तर सगळ्यांनी पाळायला पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुक्करं पाळायची हे नाही चालणार. असं म्हणत त्यांनी शिंदे गटालाही सुनावलं.

हे वाचलं का?

मिंधे गटाचे आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत, कुणी गोळीबार करतोय कुणी हातपाय तोडण्याची भाषा

काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं. मिंधे गटाचे आमदार त्यांच्यासोबत गेलेत. कुणी गणपतीमध्ये गोळीबार करतोय. कोण हातपाय तोडण्याची भाषा करतोय. ही कायद्याची भाषा आहे का? हा जर तुमचा कायदा असेल, तर तो कायदा आम्ही जाळून टाकू. हा कायदा आम्ही नाही पाळणार. आमच्यापैकी कुणी काही बोललं की लगेच कायद्याचा दंडूका आमच्या पाठिशी लावता. उचलून आतमध्ये टाकता. कुठल्या पद्धतीने कायदा चालवता आहात?

हाच का तुमचा कायदा असं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले उद्धव ठाकरे

नवी मुंबईतल्या मढवी यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांकडून धमक्या येताहेत की या गटात ये नाहीतर तुझा एन्काऊंटर करतो. पैसे मागितले जाताहेत. आमच्या रायगडच्या बबन पाटलांना त्रास देताहेत. किती लोकांची नावं सांगू. ठाण्यातल्या महिला कार्यकर्त्यांची रविवारी आदेश काढून हॉटेल तोडताहेत. हा तुमचा कायदा? तडीपाऱ्या काढताहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही फोन करून सांगितलं जातंय की गप्पपणे त्या गटात जा नाहीतर तुझ्या केसेस बाहेर काढतो. केसेस काढायचं सलून काढलंय का? असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT