राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, तर उद्यापासून कठोर निर्बंध होणार लागू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ मंत्री परिषद बोलावण्यात आली होती. या मंत्री परिषदेनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती देतान स्पष्ट केलं की, तूर्तास राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसेल. पण उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून कठोर निर्बंध असणार आहेत. तसंच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

ADVERTISEMENT

शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन असेल अशी माहिती कॅबिनेट मंत्री नबाब मलिक यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री 8 वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी असणार आहे. (weekend lockdown in the state strict restrictions will be in place from tomorrow)

त्यामुळे राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसला तरी अंशत: लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन लागू केलं जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पाहा नेमकं काय म्हणाले नवाब मलिक.

हे वाचलं का?

CM ठाकरेंचा फडणवीस आणि राज ठाकरेंना फोन, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

‘राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध असणार आहेत. हे निर्बंध उद्या रात्री 8 वाजेपासून लागू होणार आहेत. याशिवाय विकेंडला संपूर्ण लॉकडाऊन असेल. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे.’

ADVERTISEMENT

‘यावेळी शक्य असेल त्या कार्यालयांमध्ये लोकांना वर्क फ्रॉर्म होम देण्यात यावं. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली.’ अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान, यावेळी बार, हॉटेल आणि मॉल देखील बंद राहणार आहेत. पण हॉटेल आणि बारमध्ये फक्त पार्सल सेवा सुरु राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय सर्व मैदानं, गार्डन देखील बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन देखील करण्यात आलेला नसला तरी मिनी लॉकडाऊन मात्र पुकारण्यात आला आहे.

राज्यात सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नसला तरीही त्यादृष्टीने लोकांची मानसिकता तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं सध्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. त्याचीच परिणीती म्हणून आता विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे.

…स्वतः कोरडे पाषाण ! पंढरपुरात जयंत पाटलांच्या दौऱ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सुरु असणार आहे. त्यावर अद्याप तरी कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाहीत. त्यामुळे बस, रेल्वे, टॅक्सी आणि इतर ट्रान्सपोर्ट सेवा या सुरु राहणार आहेत. पण यावेळी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं असणार आहे. मात्र रात्री 8 वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT