Sexual Health: पुरुष लग्नानंतर सेक्सबद्दल करतात ‘असा’ विचार, धक्कादायक संशोधन
Sex Health: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 चा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे जो भारतीयांच्या लैंगिक आयुष्यावर आहे. या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात 80 टक्के महिला आणि 66 टक्के पुरुषांनी सांगितले की, पत्नीने पतीला सेक्ससाठी नकार देणं यात काहीही गैर नाही. (what do indian men think about sex after marriage surprising things came to light […]
ADVERTISEMENT

Sex Health: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 चा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे जो भारतीयांच्या लैंगिक आयुष्यावर आहे. या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात 80 टक्के महिला आणि 66 टक्के पुरुषांनी सांगितले की, पत्नीने पतीला सेक्ससाठी नकार देणं यात काहीही गैर नाही. (what do indian men think about sex after marriage surprising things came to light in the government report)
या सर्वेक्षणात सेक्स नाकारण्याची तीन कारणे सांगितली आहेत, पहिले पतीला काही प्रकारचा लैंगिक विकार असल्यास, पतीने दुसऱ्या महिलेसोबत सेक्स केला असेल किंवा पत्नी थकली असेल किंवा तिचा मूड नसेल तर. आठ टक्के महिला आणि दहा टक्के पुरुषांना असे वाटते की यापैकी कोणत्याही कारणामुळे पत्नी सेक्स नाकारू शकत नाही.
अहवालात असे समोर आले आहे की, देशातील 82 टक्के महिलांचे म्हणणे आहे की, त्या आपल्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकतात.
हा अहवाल सांगतो की, पाचपैकी चार (82 टक्के) स्त्रिया त्यांच्या पतीला सेक्स नाकारू शकतात. पतींना सेक्ससाठी नाही म्हणणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या गोव्यात आहे (92 टक्के) तर अरुणाचल प्रदेश (63 टक्के) आणि जम्मू आणि काश्मीर (65 टक्के) मध्ये ती सर्वात कमी आहे.