Satish Kaushik यांचा मृत्यू कशामुळे, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून कारण आलं समोर?
Satish Kaushik death investigation: अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्यानंतर एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर देणारा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आता समोर आला आहे. अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद असावा, याची पुष्टी करणारा कोणताही उल्लेख पोलिसांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये आढळून आलेला नाही. सतीश कौशिक यांचा […]
ADVERTISEMENT

Satish Kaushik death investigation: अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्यानंतर एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर देणारा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आता समोर आला आहे. अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद असावा, याची पुष्टी करणारा कोणताही उल्लेख पोलिसांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये आढळून आलेला नाही.
सतीश कौशिक यांचा मृत्यू धुळवडीच्या दिवशी झाला होता. प्राथमिक माहितीनुसार सतीश कौशिक यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. अभिनेते सतीश कौशिक हे 8 मार्च रोजी फार्महाऊसवर सर्व मित्रांसोबत होळी खेळले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सतीश कौशिक मृत्यू : पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे शंकांचं निरसन
पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की, सतीश कौशिक यांना हायपरटेन्शन आणि मधुमेह असल्याची पार्श्वभूमी आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्याचबरोबर मधुमेहामुळेही ते त्रस्त होते.
Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?