समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान प्रकरणाला ट्विस्ट मिळाला तो साक्षीदार प्रभाकर साईल समोर आल्याने. प्रभाकर साईलने 24 ऑक्टोबरला मीडियासमोर येत, आर्य़न खानला सोडवण्याच्या बदल्यात 25 कोटी रूपये के. पी. गोसावींनी मागितले होते आणि त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचं ठरलं होतं असं सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता प्रभाकर साईलची एनसीबीच्या विशेष चौकशी समितीकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये त्याने काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

एनसीबीच्या नव्या पथकाला तुम्ही काय माहिती दिली आहे?

हे वाचलं का?

मी त्यांना नवी माहिती दिलेली नाही. मुंबई पोलिसांसमोर जे पुरावे ठेवले होते आणि स्टेटमेंट दिलं होतं तेच मी आज एनसीबीला सांगितलं आहे. आज माझी चौकशी झाली त्यावेळी मी मला माहित असलेली सगळी माहिती त्यांना दिली आहे.

मुंबई पोलिसांनी जी एसआयटी स्थापन केली आहे त्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तुम्ही असंही सांगितलं होतं की तुमचा नंबर गोसावीने एस डब्ल्यू नावाने सेव्ह केला होता. पूजा ददलानीला भेटायला गेल्यानंतर तुम्हाला कॉल कर असं सांगितलं होतं म्हणजे समीर वानखेडे कॉल करत आहेत असं वाटेल हे खरं आहे का?

ADVERTISEMENT

प्रभाकर साईल-हो हे खरं आहे. के. पी. गोसावीने मला सांगितलं होतं की मी लोअर परळला गेलो की मला फोन कर, मी विचारलं कोणत्या नंबरवर फोन करू? त्याचा एक दुसरा नंबर होता त्याची माहिती मी मुंबई पोलिसांना दिली आहे. एनसीबीलाही त्याबाबत सांगितलं आहे. मी तेव्हा पाहिलं होतं की माझं नाव त्याने एडिट केलं आणि समीर वानखेडे सरांचं नाव लिहिलं आणि नंबर सेव्ह केला.

ADVERTISEMENT

तुम्ही त्यांना तो फोन केला होता का?

प्रभाकर-हो मी त्यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी शो केलं होतं की मला या नंबरवरून फोन येतो आहे.

के. पी. गोसावी फोनवर कुणाला तरी सांगत होता की सर काम होऊन जाईल, १०० टक्के त्याचा उल्लेखही तुम्ही केला होतात.. तो कुणाशी बोलत होता?

प्रभाकर- हा कॉल रात्री 2.30 च्या सुमारास करण्यात आला होता. सॅम आणि किरण गोसावी यांच्यात दोन मिटिंग झाल्यानंतर हा कॉल करण्यात आला होता. समीर वानखेडेंना 3.30 ला फोन केला होता. त्यांनी त्या कॉलवर सांगितलं की सर थोडं थांबा डील होते आहे. मी तुम्हाला अपडेट करतो.

या दोघांमध्ये कोणत्या डीलबाबत बोलणं झालं तुम्हाला काय वाटतं?

प्रभाकर- मी 2 तारखेला तिथेच होतो. तिथे आर्यन खानला स्पेशल वागणूक देण्यात आली. आर्यनला वेगळं बसवण्यात आलं होतं. त्यानंतर NCB च्या कार्यालयात ऑफिसर बसतात त्या खुर्चीवर बसला होता. त्याला स्पेशल ट्रिटमेंट मिळत असल्याचं पाहून मी तो व्हीडिओ क्लिक केला होता. किरण गोसावी तेव्हा आर्यनचं बोलणं कुणाशी तरी करून देत होता. इतरांना वेगळी वागणूक आणि याला वेगळी वागणूक मिळत होती. त्यामुळे मी ते फोनमध्ये रेकॉर्ड केलं.

समीर वानखेडेंना कॉल कधी केला?

आम्ही तिथून निघाल्यानंतर के. पी. गोसावींनी समीर वानखेडेंना फोन केला होता. त्याने सॅमलाही हे सांगितलं होतं की 25 च्या बाँडबद्दल सांग. 25 चं बोलणं झालं आहे डील 18 कोटीमधे होईल. कारण आपल्याला आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आहेत असं के.पी.ने सॅमला सांगितलं होतं.

हा कॉल करेपर्यंत पूजा ददलानीशी काही बोलणं झालं होतं का?

प्रभाकर-नाही हा कॉल करेपर्यंत पूजा ददलानीशी काही बोलणं झालं नव्हतं. लोअर परळच्या ब्रिजच्या जवळ आलो त्यावेळी एक निळी मर्सिडिझ आली. सॅम डिसिल्वाची क्रिस्टाही दूर उभी होती. त्यानंतर मला कळलं की या सगळ्या मिटिंग पैशांसाठीच होत्या.

निळी मर्सिडिझ आल्यानंतर काय घडलं?

प्रभाकर-ती कार आल्यानंतर पूजा ददलानी आणि तिच्यासोबत एक जाडा माणूस होता ते दोघे उतरले. आमची गाडी ज्या ठिकाणी थांबली होती तो एक बस स्टॉप होता. त्याच्या मागे जाऊन या सगळ्यांची मिटिंग झाली. मिटिंगमध्ये सॅमही होता.

मिटिंग झाल्यानंतर के. पी. गोसावी परत आला, मग काय झालं?

प्रभाकर-मिटिंग झाल्यानंतर के. पी. गोसावी माझ्यासोबत कारमध्ये आला. आम्ही मंत्रालयाजवळच्या लेनमध्ये गेलो. त्यावेळी त्याला सॅमचा फोन आला. तो म्हणाला पूजा माझा फोन उचलत नाही. गोसावी त्याला म्हणाला सोड आम्ही घरी चाललो. घरी गेल्यानंतर त्याचा परत मला एक फोन आला. त्यावेळी अर्जंट मला निघायला सांगितलं महालक्ष्मीला जायला सांगितलं 50 लाख रूपये घ्यायला सांगितले. त्यानंतर मला सुनील पाटील यांचा फोन आला. त्यांनी काळबादेवीला सुरती हॉटेल आहे त्याच्या मागे असलेल्या एकाला त्यातले 23 लाख रूपये द्यायला सांगितले. त्या माणसाचा नंबर मला व्हॉट्स अप केला होता. मी त्या नंबरवर फोन केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की एक लाख माझ्या अकाऊंटला टाक. मी त्यांचे अकाऊंट डिटेल्सही विचारले. त्यांनी मला व्हॉट्स अपवरून चेकचा फोटो पाठवला. एक लाख ट्रान्सफर करण्यासाठी जो सर्व्हिस चार्ज लागतो तो माझ्याकडे नव्हता. तर मी त्यांना विचारलं की 95 हजार पाठवू का? म्हणजे त्यातले पैसे मी सर्व्हिस चार्ज म्हणून देऊ शकतो. काळबादेवीमध्येच मनी ट्रान्सफरचं शॉप होतं तिथून मी ते पैसे ट्रान्सफर केले. त्याचा एक हजार रूपये चार्जही भरला. मी त्यांना विचारलं आता 4 हजार उरलेत त्याचं काय करू? तर ते म्हणाले ते पैसे तुझ्याकडे ठेव. बाकीचे जे पैसे होते ते मी के. पी. गोसावीला दिले होते.

38 लाख परत केले होते असं सांगण्यात आलं होतं, तुम्हीच ते वक्तव्य केलं होतं.

प्रभाकर-हो मी 50 लाखातले 23 लाख त्यांनी सांगितलेल्या माणसाला दिले. एक लाख रूपये सुनील पाटील यांना ट्रान्सफर केले. उरलेले 26 लाख के. पी गोसावीला दिले. त्याच दिवशी संध्याकाळी मला त्यांचा फोन आला त्यांनी मला सांगितलं माझ्या घराच्या किचनमध्ये पाच लाख रूपये भरून ठेवलेली बॅग आहे ती घे आणि मला वाशी ब्रिजच्या खाली भेट. मी तिथे पोहचल्यावर ते म्हणाले इनऑर्बिटला ये. मी तिकडे गेल्यानंतर माझ्याकडे पाच लाख रूपये होतेच. किरण तिकडे आला. माझ्या बॅगेतच त्यांनी आणखी काही पैसे भरले. मला सांगितलं इथून ओला करून चर्चगेटला जा. तुला सॅम फोन करणार आहे. त्याआधी २३ लाख ज्याला दिले होते त्याच्याकडूनही ते पैसे घे आणि सगळे पैसे त्याला परत कर. मी चर्चगेटला गेलो तेव्हा मला सॅम फोन करत होता. व्हॉट्स अपवर त्याचा फोन येत होता. मंत्रालयाच्या पुढे एलआयसी बिल्डिंग आहे तिथे मी त्याला भेटलो आणि पैसे दिले. ते पंधरा लाख होते. बाकीचे 23 लाख कुठे आहेत हे मला माहित होतं मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ते देतो. मी त्या व्यक्तीकडे गेलो आणि पैसे घेतले 15 लाख आधी नंतर 23 लाख असे 38 लाख मी सॅमला दिले.

2 किंवा 3 ताऱीख यामध्ये जेव्हा हे सगळे व्यवहार होत होते तेव्हा समीर वानखेडे कुणाच्या संपर्कात होते का?’

प्रभाकर-समीर वानखेडे फक्त त्यादिवशी रात्री फोन केला होता. टर्मिनलवर त्यांची दोन-तीन वेळा मिटिंग झाली. त्या सगळ्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून फोटो काढल्या.

तुम्ही छापा मारला तेव्हा तिथे तुम्ही गेला होतात का?

प्रभाकर-नाही छापा मारला तेव्हा मी तिथे गेलो नाही. टर्मिनलच्या पुढे क्रूझ उभी होती. मी क्रूझपर्यंत गेलो नव्हतो. तिथे मला सगळंच संशयास्पद वाटलं म्हणून मी काही फोटो गपचूप काढले होते.

हे सगळं डील फिस्कटलं, तुम्ही पैसे परत केले त्यानंतर के. पी. ने कधी फोन करून सांगितलं का की सगळं फिस्कटलं आहे म्हणून?

प्रभाकर-सुनील पाटील यांचा मला फोन आला होता. जेव्हा मी 38 लाख रिटर्न केले त्यादिवशी संध्याकाळी हा फोन होता. त्यात म्हणाले अरे तुझ्या साहेबाने एक सेल्फी व्हायरल केला त्यामुळे डील फिस्कटली नाहीतर सगळ्यांना पैसे मिळाले असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT