काय आहे Smiling Death?, ज्यामध्ये मृत्यूपूर्वी प्रचंड येतं हसू!

मुंबई तक

ADVERTISEMENT

what is smiling death or crush syndrome
what is smiling death or crush syndrome
social share
google news

What is Smiling Death : कोणाला कधी मरण येईल हे सांगता येत नाही? कारण प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ही ठरलीय. कुणाचा अपघातामुळे लगेच मृत्यू होईल, किंवा कुणाचा दिर्घ आजारामुळे मृत्यू येईल. अशात आता स्माईलिंग डेथची (Smiling Death) चर्चा आहे. ही स्माईलिंग डेथ एखाद्या व्यक्तीवर कधी आणि केव्हा येते? हे जाणून घेऊयात.(what is smiling death or crush syndrome know the all details)

ADVERTISEMENT

या स्माईलिंग डेथच (Smiling Death) उदाहरण देऊन आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही आणि तुमचा मित्र एका इमारतीच्या खाली उभे आहात. आणि अचानक बिल्डींग कोसळली. या घटनेत तुम्ही थोडक्यात बचावला आहात, आणि तुमच्या मित्राचे अर्ध शरीर ढीगाऱ्याखाली अडकले असेल. अशावेळी साहजिक तुम्ही तुमच्या मित्राला वाचवायचा प्रयत्न करालं. पण तुमचे हे प्रयत्न तुमच्या मित्राला मृत्यूच्या दाराला लोटू शकतात. यामध्ये तुमची चुकी काहीच नाही नसेल, कारण तुम्ही तुमच्या मित्राला अपघातातून वाचवत आहात. पण तरीही तुमच्या मित्रावर मृत्यू ओढवू शकतो. हे कसे शक्य आहे हे विज्ञानातून समजून घेऊयात.

हे वाचलं का?

कसा होतो मृत्यू?

जेव्हा अशाप्रकारच्या अपघातात शरीराचा कोणताही हिस्सा म्हणजे, हाथ, पाय अथवा दुसरे अंग जर ढिगाऱ्याखाली अडकले, तर तो शरीरावरील ढिगाऱ्याचा भाग लगेच काढता येत नाही. कारण ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे शरीराच्या ऊतींमध्ये जास्त दबाव निर्माण होतो. यामुळे ऊतींचे नुकसान होते आणि रक्तप्रवाहही थांबतो. अशा अवस्थेत शरीरात Myoglobin नावाचे प्रोटीन रिलीज होते. Myoglobin एक गोलाकार प्रोटीन असते, जे मांसपेशियांमध्ये सापडते. Myoglobin चे काम Muscle Cells मध्ये ऑक्सिजन स्टोर करण्याचे काम करते. त्यामुळे हा ऑक्सिजन आवश्यकतेनुसार वापरता येईल.

Myoglobin रिलीज झाल्यास किडनी फेल?

Myoglobin शरीरातून रिलीज झाल्यास किडनी फेल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. या प्रक्रियेला क्रश सिंड्रोम (Crush Syndrome)म्हणतात. अशा परिस्थितीत शरीरावर असलेला भार अचानक हटवल्याने क्रश सिंड्रोममुळे ऊतींमधील ऑक्सिजनचे प्रमाण वेगाने वाढू लागते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मृत्यूपूर्वी व्यक्ती हसायला लागतो

अशा परिस्थितीत रक्तातील पोटॅशियमच्या अतिप्रवाहामुळे हृदयाचे ठोक खराब होतात. आणि शॉकमुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा प्रकारच्या मृ्त्यूपुर्वी क्रश सिंड्रोममध्ये (Crush Syndrome)असलेला व्यक्ती बाहेर काढण्यापुर्वी आनंदी असतो. परंतू क्रशिंग प्रेशर अचानक सोडल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू होतो. अशाप्रकारच्या मृत्युपुर्वी व्यक्ती अनैच्छीकपणे हसायला लागते. मृ्त्यू्च्या याच अवस्थेला स्माईलिग डेथ म्हणतात.

क्रश सिंड्रोमची (Crush Syndrome) अधिक प्रकरणे भुकंपा दरम्यान समोर येतात. युद्ध, भूकंप, बिल्डींग कोसळणे, रस्ते अपघात अशा अपघातात ही प्रकरणे आढळतात. अशा परीस्थितीत रेस्क्यू टीम बचावा दरम्यान विशेष लक्ष देते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT