Exclusive : मशालधारी ठाकरेंची पुढची खेळी काय? काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं गेलं आहे. मशाल हे चिन्ह शिवसेनेचं जुनं चिन्ह होतं. त्यावर छगन भुजबळ १९८६ मध्ये निवडूनही आले होते. आता उद्धव ठाकरे हे कसं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

लढाई अजून बाकी आहे

आमची लढाई अजून बाकी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला मिळालं आहे कारण उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ही नावं शिवसेनेपासून वेगळी करता येणारच नाहीत. दुसऱ्या गटाला जे नाव मिळालं त्यात बाळासाहेब हे नाव आहे. पण बाळासाहेब कुठले? कारण बाळासाहेब अनेक नेत्यांना म्हटलं जातं. हिंदूहृदय सम्राट यांचा आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातच आला आहे. गेल्या अडीच वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तम काम केलं. आम्हाला धगधगती मशाल मिळाली आहे. आधीही आमचा विजय झाला होता आताही विजय झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरही मशाल आहे. ती मशाल आणि आमची मशाल सारखी आहे.

मशाल हे चिन्ह विजयाचं प्रतीक

हा जो राजकारणातला अंधःकार झाला आहे त्यात आम्ही मशाल या आमच्या चिन्हामुळे प्रकाश टाकणार आहोत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बहुमत आमच्या बाजूने असं सांगत आहेत. बंड आणि उठाव करायला ताकद लागले. हे सगळे गद्दार पळून गेले. आधी सुरतला मग गुवाहाटीला गेले. ४० गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं का जात नाही? पडद्यामागे राहून शिवसेना संपवण्याचे, ठाकरे कुटुंब संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे. लोकांना ही सगळी बाब कळली आहे.

हे वाचलं का?

इतका नीच आणि निर्ल्लज प्रकार कुणी केला नव्हता

ज्या धनुष्यबाणाचं बाळासाहेब ठाकरेंनी पूजन केलं होतं. हा धनुष्यबाण गोठवण्याचं पाप या गद्दारांनी केलं आहे. राजकारणात सगळा गोंधळ उडाला आहे. अत्यंत नीच आणि निर्ल्लज प्रकार या गद्दारांनी केला आहे. देशात अशा प्रकारचं राजकारण होणं हे राज्याच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीन घातक आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून हास्यास्पद दावे केले जात आहेत

एकनाथ शिंदे यांच्याकडून जे काही दावे केले जात आहेत ते हास्यास्पद आहे. ठाकरे नाव, शिवसेना नाव हे का वापरत आहेत? विविध दावे का करत आहेत? आधी महाविकास आघाडीच्या जीवावर सत्ता उपभोगली तेव्हा हे सगळे दावे कुठे गेले होते. शिवसेना प्रायव्हेट लिमिडेट कंपनी नाही, पण मग मी आमदारकीचा राजीनामा देतो या ४० आमदारांनी राजीनामा द्यावा त्यानंतर निवडणूक लढवू. लोक ठरवतील शिवसेना कुणाची आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

एवढं मोठं बंड होईल असं वाटलं नव्हतं का?

मागच्या एक-दीड वर्षात या सगळ्यावर चर्चा होत होती. काही लोक आम्हाला सांगत होते. मी दावोसला गेलो होतो. त्यावेळी २० मे रोजी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? असंही उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं होतं. पूर्ण विश्वास दाखवला आहे. निवडणूक तिकिट देण्यापासून ते त्यांची भांडणं सोडवण्यापासून सगळं काही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. नगरविकास सारखं खातंही त्यांना दिलं. एक मंत्री असे आहेत ज्यांनी अन्नाची शपथ घेतली होती गद्दारी करणार नाही सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी तिकडे गेले. ५० खोके आणि एकदम ओके हे राजकारण असा पायंडा पडला गेला आहे. जो चुकीचा आहे. आम्ही स्वच्छ राजकारण करत आलो आहोत. मात्र या सगळ्या गोष्टी वेगळ्या ठिकाणी चालल्या आहेत.

ADVERTISEMENT

गद्दारांची आधीची भाषणं ऐकून बघा

गद्दारी करण्याच्या आधीची भाषणं ऐकून बघा, आत्ताची भाषणं ऐका त्यातला फरक लक्षात येतो. लोकांची कामं केली तर लोकांचा विश्वास आणि आदर वाढत राहतो. सत्ता येते आणि जाते पण नाव गेलं तर ते पद्धतीने येत नाही. ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली असं ते स्वतःच सांगत आहेत असाही टोला आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT