KRK Arrested : 2020 मधील ट्विट प्रकरण काय, ज्यामुळे मुंबई पोलिसांनी कमाल आर खानला अटक केली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वादग्रस्त अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल खान याला दोन वर्षांपूर्वीच्या ट्विट प्रकरणी पोलिसांनी विमानतळावर अटकेची कारवाई केली आहे. कमाल आर खान याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवर आक्षेप घेत मालाड पोलीस ठाण्यात केआरके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्विट प्रकरणी आज अटक करण्यात आली आहे. युवासेना पदाधिकारी राहुल कनल यांनी अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी 2020 साली तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी केअरकेला अटक केली आहे. नेमका हा प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

इरफान खानबाबत वादग्रस्त ट्विट

अभिनेता इरफान खानच्या बाबतीत ट्विट करताना कमाल म्हणाला होता, “देव करो की, वाईट काळ कुणावर येऊ नये. मात्र, सत्य हे आहे की, इरफान खान हा अतिशय वाईट व्यक्ती होता. त्यानं अनेकांवर अन्याय केलं. इरफान हा एक ऍक्टर आहे जो निर्मात्यांना कुत्रा म्हणायचा. चित्रपटांची शूटिंग अर्धवट सोडून द्यायचा. त्यामुळे बिचारे निर्माते रडत राहिले.”

कमाल खाननं अभिनेता ऋषी कपूर यांच्याबाबत देखील बदनामीकारक ट्विट केलं होतं.

ऋषी कपूर हे एच. एन रिलायन्स रुग्णालयात ऍडमिट आहेत. मला त्यांना म्हणायचं आहे. सर, बरं होऊन परत या, तसंच निघून जाऊ नका. कारण दोन-तीन दिवसात दारूची दुकाने उघडणार आहेत.”

हे वाचलं का?

राहुल कनाल यांनी काय केली होती तक्रार?

कमाल खान ने सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते इरफान खान ऋषी कपूर यांच्या चारित्र्यविषयी जन माणसात बदनामी करण्याचे हेतूने सोशल मीडियावरील ट्विटर या माध्यमाचा वापर केला. इरफान खान यांच्याविषयी विषयी बदनामीकारक मजकूर वापरून आणि ऋषी कपूर यांच्या विषयी ते व्यासनाधीन असून दारू न मिळाल्याने ते गंभीर आजारी झाले आहेत, अशा आशयाचे घाणेरडे शब्द व भाषा वापरून सार्वजनिक रित्या ट्विट केल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार राहुल कनल यांनी वांद्रे पोलिसात कमाल खानच्या विरोधात 20 मे 2020 रोजी तक्रार दाखल केली होती.

केआरकेच्या अटकेनंतर राहुल कनाल काय म्हणाले?

कमाल आर खानला अटक करण्यात आल्यानतंर तक्रारदार राहुल कनाल म्हणाले, “माझ्या तक्रारीनंतर कमाल आर खानला आज अटक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचं मी स्वागत करतो. केआरके सोशल मीडियावर आपत्तीजनक टीका-टिप्पणी करत असतो आणि असभ्य भाषेचा वापर करतो. अशा प्रकारचं वर्तन समाजात स्वीकारलं जाऊ शकत नाही. केआरकेला अटक करून मुंबई पोलिसांनी अशा लोकांना कडक इशारा दिला आहे.”

ADVERTISEMENT

सलमान खानने केआरके विरोधात दाखल केला होता बदनामीचा खटला

अभिनेता सलमान खाननंही कमाल आर खानवर बदनामी केल्याचा खटला भरला होता. राधे चित्रपटाचं नकारात्मक समीक्षा करण्याबरोबरच केआरकेने सलमान खानवर वैयक्तिक टीका केली होती. अभिनेता मनोज वाजपेयीनेही केआरके विरोधात कारवाई केली होती.

ADVERTISEMENT

कमाल आर खानने अनेक हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तो चित्रपट निर्माताही आहे. २००५ मध्ये सितम चित्रपटापासून त्याने निर्माता म्हणून सुरूवात केली होती. कमी बजेटमधील अनेक भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत त्याने काम केलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT