दुसरी पत्नी हेलनला घरी आणलं तेव्हा वडिलांनी सलमान-अरबाजला एकच सांगितलेलं..
Arbaaz Khan and Helen: मुंबई: अरबाज खान (Arbaaz Khan) बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबातील आहे. तर त्याचा भाऊ सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा ए-लिस्ट अभिनेता आहे, तर त्यांचे वडील सलीम खान (Salim Khan) हे 70-80 च्या दशकात चित्रपट उद्योगातीव प्रसिद्ध पटकथा लेखक होते. अरबाज हा नेहमीच चर्चेत असतो. स्वतःचे लग्न आणि घटस्फोटासोबतच त्याची सावत्र आई […]
ADVERTISEMENT
Arbaaz Khan and Helen: मुंबई: अरबाज खान (Arbaaz Khan) बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबातील आहे. तर त्याचा भाऊ सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा ए-लिस्ट अभिनेता आहे, तर त्यांचे वडील सलीम खान (Salim Khan) हे 70-80 च्या दशकात चित्रपट उद्योगातीव प्रसिद्ध पटकथा लेखक होते. अरबाज हा नेहमीच चर्चेत असतो. स्वतःचे लग्न आणि घटस्फोटासोबतच त्याची सावत्र आई अभिनेत्री हेलनसोबतच्या (Helen) त्याच्या नात्याचीही अनेकदा चर्चा झाली आहे. आता अरबाजने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, वडील सलीम खान यांनी आपली दुसरी पत्नी हेलनशी ओळख करून देताना आपल्या सर्व मुलांना नेमकं काय सांगितलं होतं. (when salim khan brought his second wife helen home what did he say to salman and arbaaz khan)
ADVERTISEMENT
सलीम यांनी मुलांना काय सांगितले होतं?
सलीम खान यांचे पहिले लग्न 1964 मध्ये अरबाजची आई सुशीला चरक उर्फ सलमा खान यांच्यासोबत झाले होते. या लग्नापासून त्यांना तीन मुले – सलमान, अरबाज आणि सोहेल आणि एक मुलगी अलविरा खान. यानंतर 1980 मध्ये त्यांनी हेलनशी दुसरे लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे – अर्पिता खान-शर्मा. अरबाज सांगतो की हेलनची ओळख करून देण्यापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला आणि इतर भावंडांना हेलनचा त्यांच्या आईप्रमाणेच आदर करण्यास सांगितलं होतं.
ई-टाइम्सशी बोलताना अरबाज खान म्हणला, ‘आम्ही खूप दिवसांपासून एकत्र आहोत आणि हेलन आंटीच्या खूप जवळ आहोत. खरंतर आम्ही हेलन आंटीसोबत इतके दिवस आहोत, तरीही आम्ही तिला हेलन आंटीच म्हणतो, कारण आमचं नातं तसंच आहे. पण साहजिकच ती आमची आई आहे. आता ती आमच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे आणि जेव्हा हे सर्व सुरू झाले तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यामुळे आई-वडिलांच्या आयुष्यात जो काही ड्रामा घडला, त्यापासून आम्हाला दूरच ठेवण्यात आलं होतं.’
हे वाचलं का?
सलमान खानच्या जीवाला धोका; गँगस्टरच्या धमकीनंतर वाढवण्यात आली सुरक्षा
तो पुढे म्हणाला, ‘पण लवकरच आम्हाला समजले की त्यांना आमच्या कुटुंबात आणले जात आहे. आणि आमच्या वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली होती की, बघा.. मला माहित आहे तुम्ही लोक तुमच्या आईच्या बाजूने आहात. जगात तुम्ही तुमच्या आईवर सर्वात जास्त प्रेम करता. तुम्ही लोक तिच्यावर (हेलन) इतके प्रेम कधीच करणार नाही. पण मला तुमच्याकडून एक गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे आदर. तिला तेवढाच आदर द्या कारण ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. हे सत्य तुम्हाला स्वीकारावे लागेल. आणि जर तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम आणि आदर असेल तर तुम्ही विश्वास ठेवाल की हेच सत्य आहे.’
ADVERTISEMENT
‘प्रकरण बंद करायचं असेल तर…’ सलमान खानला घातपाताची पुन्हा धमकी!
ADVERTISEMENT
गेल्या महिन्यात सलीम खान अरबाज खानच्या चॅट शो द इन्व्हिन्सिबल्समध्ये (The Invincibles) दिसले होते. येथे त्यांनी सुशीला चरकसोबतची प्रेमकहाणी आणि हेलनसोबतचे नाते आणि काम याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. सलीम खान यांची मुलाखत तेव्हा बरीच चर्चेत होती.
सलमान खानसोबत कधी भांडण झालंय का? बॉडीगार्ड शेराने काय दिलं उत्तर?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT