आर्यन खानला क्रूझवर कुणी बोलवलं?; नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत घेतलं नाव
कॉर्डेलिया क्रूज जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना अटक केली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. मात्र, या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत कुणाच्या बोलावण्यावरून आर्यन खान […]
ADVERTISEMENT

कॉर्डेलिया क्रूज जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना अटक केली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. मात्र, या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत कुणाच्या बोलावण्यावरून आर्यन खान क्रूझवर गेला होता, याचा गौप्यस्फोट केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 3 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईबद्दल काही नवीन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर आरोप केले आहेत.
Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार… अशी असेल दिनचर्या
काय म्हणाले मलिक?