कोण आहे मलालाचा पती असर मलिक?; पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी काय आहे कनेक्शन?

मुंबई तक

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझई लग्नाच्या बेडीत अडकली. मलालाने ट्विटरवर निकाह आणि कुटुंबियांसोबतचे फोटो ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली मलालाने असर मलिकसोबत लग्न केलं आहे. मलालासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर असर मलिक याच्याबद्दल अनेकजण माहिती शोधताना दिसत आहेत. मलाला युसुफझईने ट्विटवरवर फोटो टाकून असर आणि मी विवाहबद्ध झाल्याची माहिती दिली. बर्मिंघम येथे मलालाचा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझई लग्नाच्या बेडीत अडकली.

मलालाने ट्विटरवर निकाह आणि कुटुंबियांसोबतचे फोटो ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली मलालाने असर मलिकसोबत लग्न केलं आहे.

मलालासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर असर मलिक याच्याबद्दल अनेकजण माहिती शोधताना दिसत आहेत.

मलाला युसुफझईने ट्विटवरवर फोटो टाकून असर आणि मी विवाहबद्ध झाल्याची माहिती दिली.

बर्मिंघम येथे मलालाचा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. मलालाने पती असर मलिकसोबतचे काही फोटोही ट्वीट केले आहेत.

मलाला युसुफझईचा पती असर मलिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. असर मलिकच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये दिलेल्या माहितीनुसार असर पाकिस्तान क्रिकेट मंडळात हाय परफॉर्मन्स मॅनेजर (General Manager High Performance) आहे.

असर मलिकने लाहौर येथील मॅनेजमेंट सायन्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजशास्त्र विषयातून पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे.

असर मलिकने कोका कोला आणि फ्राईसलँड कॅपिंनासारख्या प्रसिद्ध ब्रँडसोबतही काम केलेलं आहे.

असर मलिकने पाकिस्तान सुपर लीगची फ्रेंचायजी असलेल्या मुल्तान सुल्तानसाठीही ऑपरेशनल मॅनेजर म्हणूनही काम केलेलं आहे.

माहितीप्रमाणे असर मलिक 2020 मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी जोडला गेला.

हे वाचलं का?

    follow whatsapp