एकनाथ शिंदेसोंबत का गेलो? बाळासाहेबांचे विश्वासू सेवक थापा यांनी सांगितलं कारण, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे थापा हे आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. थापा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. चंपासिंह थापा हे मातोश्रीवर प्रदीर्घ काळ होते. तसंच मोरेश्वर राजे हेदेखील त्यांच्यासोबत होते. आज ठाण्यातल्या टेंभीनाका या ठिकाणी झालेल्या दुर्गेश्वरी मातेच्या आगमन मिरवणुकीत चंपासिंह थापा आणि मोरेश्वर राजे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? थापा यांनी सांगितलं कारण

मला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पटतात. तसंच एकनाथ शिंदे यांचेही विचार पटतात. आपल्या मनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी शिंदे गटात आलो असं सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण का आलो हे थापा यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

बाळासाहेबांसोबत कोण राहतो? असे जर कुणी विचारले, तर लगेच नाव यायचं ते चंपासिंह थापा यांचं. ते बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिले. आता थापा हे सुद्धा देवीच्या उत्सवात सामील झाले असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. जी चूक २०१९ ला व्हायला नको होती, ती तुम्ही दुरुस्त करत आहात. बाळासाहेब ठाकरेंचे विचार जो कोणी पुढे नेईल. त्याच्याबरोबर सदैव राहील, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे.

कोण आहेत चंपासिंह थापा?

चंपासिंह थापा हे बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे असायचे. दसरा मेळावा असेल किंवा जाहीर सभा असेल तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असायचे. अनेकदा त्यांचेही फोटो समोर आले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं या सगळ्या जबाबदाऱ्या थापा चोखपणे पार पाडत. बाळासाहेब ठाकरे यांना थापा यांनी कायमच सावलीसारखी सोबत केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेतही बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाजवळ थापा होते. आज याच थापांनी एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जातो आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT