Pathaan : स्मृती इराणींनी ‘पठाण’ का पाहिला नाही? सांगितलं हे कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan Movie : पठाण चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त हिट ठरत आहे (Pathaan movie hit on box office). या चित्रपटावर बहिष्कार (Boycott Pathan Movie) टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र शाहरुख खान (Shahrukh khan) आणि दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukon) चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे (Record break Collection). आता केंद्रीय मंत्री आणि टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी यांनी (Smriti irani) आजतकच्या एका कार्यक्रमात या चित्रपटाबद्दल आणि बहिष्काराबद्दल बोलल्या. ‘आज तक’शी बोलताना स्मृती इराणी शाहरुख खानशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी सांगितले. त्याचवेळी त्या शाहरुखला कसं पसंत करतात, हे उघड झाले. Why didn’t Smriti Irani watch the movie ‘Pathan’?

ADVERTISEMENT

Pathaan : पठाणची तुफान कमाई; अवघ्या 12 दिवसांत गाठला इतका मोठा आकडा

पठाण चित्रपट पाहिला का?

स्मृती इराणी म्हणाल्या की, त्यांनी पठाण पाहिला नसला तरी रोहित शेट्टीचा सर्कस नक्कीच पाहिला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, ‘रोहित शेट्टीचा सर्कस चित्रपट मी पाहिला आहे. ज्यात एकही इंटेलिजेंस नाही जो मला म्हणेल की अरे व्वा काय अप्रतिम काम पाहिले आहे.

हे वाचलं का?

Pathaan : “ते काम दुसरं कोणी करु शकत नाही”; रेणुका शहाणे-SRK चा मजेशीर संवाद

यासोबतच ट्रोलबद्दल बोलताना स्मृती म्हणाल्या की, जेव्हा लोक इंटरनेटवर पाहतील तेव्हा मला टोमणे मारतील. तुम्ही तो सर्वात हास्यास्पद चित्रपट पाहिला असे म्हणतील. पण मला माहित आहे की मला बरे वाटत नव्हते, मी 24 तास काम केले, म्हणून मला वाटले की मी एक गोष्ट पहावी, जिथे मला हसता येईल, म्हणूनच मी सर्कस चित्रपट पाहिला. पण तेव्हा माझ्याकडे अडीच तास होते. सध्या सेशन चालू आहे. आज मी जाऊन चित्रपट पाहिलं तर पब्लिकच मला मारेल, तुला एवढा वेळ कुठून आला म्हणून, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

पठाणशी खास संबंध

जेव्हा स्मृती यांना विचारण्यात आले की शाहरुख खानचा पठाण चित्रपट पाहिला का? यावर स्मृती यांनी स्पष्टपणे सांगितले की, ती कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर भाष्य करणार नाही. शाहरुख माझ्या पतीचा जुना मित्र आहे. कुटुंबाशी त्याच्यासोबत 30 वर्षांचे नाते आहे. त्याने माझ्या मोठ्या मुलीचे नावही ठेवले आहे. स्मृती इराणी, सेशनदरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल देखील बोलल्या आणि चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांचा आदर करण्यास सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT