हर हर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातो आहे? नेमका वाद आहे तरी काय?
हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला. मात्र या सिनेमातल्या दृश्यांवरून आणि काही ऐतिहासिक संदर्भांवरून वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधल्या मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला. तसंच प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता. मात्र या सिनेमामुळे वाद का निर्माण […]
ADVERTISEMENT

हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला. मात्र या सिनेमातल्या दृश्यांवरून आणि काही ऐतिहासिक संदर्भांवरून वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधल्या मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला. तसंच प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता. मात्र या सिनेमामुळे वाद का निर्माण झाला आहे ते जाणून घेऊ.
सिनेमा मूळ इतिहासाला धरून नसल्याचा आरोप
मूळ इतिहासाला धरून हा सिनेमा नाही, त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जी दृश्य दाखवण्यात आली आहेत तसे प्रसंग नाहीत हा मुख्य आक्षेप विविध संघटनांनी घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला या सिनेमात मराठी साम्राज्य म्हटलं गेले आहे मात्र ते मराठा साम्राज्य आहे
चित्रपटातल्या संवादांवर आक्षेप
चित्रपटातील संवाद हे शिवकालीन वाटत नाहीत. अफझल खानाचा कोथळा काढताना खानाने छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर वार केल्यानंतर येणाऱ्या रक्तस्रावाच्या प्रसंगावरही आक्षेप घेण्यात आला आहे हे दृश्य इतिहासाला धरून नाही असं अनेक संघटनांचं म्हणणं आहे.