Tauktae चक्रीवादळ, मोदींनी महाराष्ट्राला मदत जाहीर न करणे हा अन्यायच-खडसे
Tauktae चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले त्यांनी पाहणी दौरा करून गुजरातला 1 हजार कोटींची मदतही जाहीर केली. मात्र महाराष्ट्रात ना दौरा केला ना मदत जाहीर केली. हा महाराष्ट्रावर अन्यायच आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगावात त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना ही […]
ADVERTISEMENT
Tauktae चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले त्यांनी पाहणी दौरा करून गुजरातला 1 हजार कोटींची मदतही जाहीर केली. मात्र महाराष्ट्रात ना दौरा केला ना मदत जाहीर केली. हा महाराष्ट्रावर अन्यायच आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगावात त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना ही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नऊ तास Tauktae वादळाशी झुंज देऊन सातारचा पठ्ठ्या सुखरुप घरी
एकनाथ खडसे सोमवारी जळगावात आलेले होते. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की ‘ज्याचे नुकसान होते, तो शेवटी देशाचा नागरिक आहे. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. राज्यातील नागरिकांना मदत करणे ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माझी मोदींना विनंती आहे, त्यांना महाराष्ट्राला जी काही मदत करायची असेल ती लवकर करावी’
हे वाचलं का?
Tauktae: पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत जाहीर करतील-संजय राऊत
केंद्राने आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा
ADVERTISEMENT
सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. परंतु, म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना अँफोटेरेसीन बी इंजेक्शनची गरज भासत आहे. या औषधासाठी परदेशातून कच्चा माल मागवावा लागतो. केंद्राकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील रुग्णांसाठी आवश्यक तो औषधांचा पुरवठा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केल्यानंतर आणि गुजरातला मदत जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर मोदींचं विमान महाराष्ट्रातही उतरेल आणि ते महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत जाहीर करतील असा टोलाही लगावला होता. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता मी नुकसानग्रस्त भागाचं नुकसान पाहण्यासाठी जमिनीवर उतरलो आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. या सगळ्या नेत्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही जळगावात प्रसार माध्यमांशी बोलत असताना मोदींनी महाराष्ट्राला मदत जाहीर न करणं हा महाराष्ट्रावर अन्यायच आहे असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT