NCERT च्या अभ्यासक्रमातून बाबरी विध्वंसाचा इतिहास हटवला, संचालकांनी सांगितलं कारण

रोहिणी ठोंबरे

NCERT : NCERT चे इयत्ता बारावीचे नवीन सुधारित राज्यशास्त्राचे पुस्तक आता बाजारात विकण्यासाठी आले आहे. त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये बाबरी मशिदीचे नाव हटवल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाठ्यपुस्तकांमधील दंगलीच्या संदर्भांवर NCERT संचालक काय म्हणाले?

point

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये आणखी कोणता इतिहास हटवला?

NCERT 12th syllabus changes :  NCERT चे इयत्ता बारावीचे सुधारित राज्यशास्त्र विषयाचे नवीन पुस्तक आता बाजारात आले आहे. त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख हटवल्याचा मोठा मुद्दा आहे. आता NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. पुस्तकांमधील बदलांवर सकलानी यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. (why should we teach about riots in schools ncert chief dinesh prasad saklani on changes in syllabus)

शालेय अभ्यासक्रमाचे 'भगवेकरण' केल्याचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले,'अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही, सर्व काही तथ्य आणि पुराव्यांवर आधारित आहे. एखादी गोष्ट अप्रासंगिक झाली असेल तर ती बदलावी लागेल, ती का बदलू नये? मला इथे भगवेकरण दिसत नाही. विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती कळावी म्हणून आम्ही इतिहास शिकवतो, त्याला युद्धाच्या मैदानात उतरवण्यासाठी नाही.'

हेही वाचा: निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो- माजी निवडणूक अधिकारी

सकलानी पुढे म्हणाले की, 'पुस्तकांमध्ये केलेले बदल हा वार्षिक उजळणीचा भाग असून, याला चर्चेचा विषय बनवू नये.' ते म्हणाले की, 'हे बदल त्या विषयाच्या तज्ञांकडून ठरवले जातात आणि ते या प्रक्रियेत निर्देश किंवा हस्तक्षेप करत नाहीत. त्यांच्या मते NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार, शालेय पुस्तकांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे.


पाठ्यपुस्तकांमधील दंगलीच्या संदर्भांवर NCERT संचालक काय म्हणाले?

शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये गुजरातमधील दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या संदर्भांवर NCERT संचालक दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले, 'शालेय अभ्यासक्रमांमध्ये दंगली का शिकवायच्या? आम्हाला हिंसक व्यक्ती नव्हे तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत. आम्हाला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवायचंय का की, ज्याने ते आक्रमक होतील?, समाजात द्वेष निर्माण करतील किंवा द्वेषाला बळी पडतील? हाच शिक्षणाचा उद्देश आहे का? हिंसेबद्दल का शिकवलं पाहिजे, हे मुले मोठी झाल्यावर त्यांना कळेल. पण हे शालेय पुस्तकांमध्ये करू नये. काय आणि का झाले? हे समजून घेण्यासाठी त्यांना मोठे होऊ द्या, बदलांबद्दलची गडबड अप्रासंगिक आहे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp