गुजराती भूमाफियांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करतायत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकणातील रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रोजेक्टला मनसेने आपला पाठींबा दर्शवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. कोरोनानंतर राज्याच्या अर्थकारणाला गती द्यायची असेल तर नाणारसारखे प्रकल्प राज्यातून जाणं परवडणारं नसल्याचं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात लिहीलं आहे. परंतू सुरुवातीला नाणारला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंचं आता एकदम मतपरिवर्तन कसं झालं असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

ADVERTISEMENT

काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंचा नाणार प्रकल्पाला विरोध होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं? नाणारमध्ये २०० पेक्षा जास्त गुजराती भूमाफियांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत की कोकणाच्या विकासासाठी हे मला माहिती नाही अशा शब्दांत रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. नाणारमधील लोकांचा आजही या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरेंनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस दाखवावं असं आवाहन विनायक राऊत यांनी केलं आहे.

राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!

हे वाचलं का?

आपल्या पत्रात राज ठाकरेंनी जो प्रकल्प रोजगाराच्या अमर्याद संधी पुढे आणेल तो स्विकारणं ही आजची गरज आहे. कोकणातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कोकणातील तरुणांकडे प्रचंड बुद्धीमत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या संधीच्या आड कोणी येत असेल तर त्या लोकांनी मनसेशी संघर्षाची तयारी ठेवावी असा इशाराही राज ठाकरेंनी नाव न घेता शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता. नाणार प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात शिवसेनेनेही सहभाग नोंदवला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT