Uddhav Thackeray : मोदी मुंबईत असतानाच उद्धव ठाकरेंनी का घेतली ‘त्या’ आजींची भेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर विशेष पुरस्कार स्वीकारण्यासाठी रविवारी मुंबईत आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळेतच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८० वर्षीय शिवसैनिक चंद्रभागाबाई शिंदे यांची भेट घेतली. पुरस्काराच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत ठाकरेंनी हा भेटीचा कार्यक्रम का घडवून आणला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी सायंकाळी ८० वर्षीय चंद्रभागाबाई शिंदे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री त्या आजीच्या कुटुंबियांशी संवाद करत असतानाच दुसरीकडे मुंबईतीलच षण्मुखानंद सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जात होता.

साहेब घाबरु नका, मुंबईत शिवसेनाच येणार ! चंद्रभागा आजींचा उद्धव ठाकरेंना आशिर्वाद

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदी मुंबईत असताना, त्यांना पुरस्कार दिला जात असताना नेमकं उद्धव ठाकरेंनी आजीची भेट का घेतली असावी, अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आजीच्या भेटीबद्दल राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नियोजित होता. मात्र, तरीही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान निष्ठावान शिवसैनिक असलेल्या चंद्रभागाबाईंना भेटण्याचा निर्णय घेतला. आपल्यासाठी शिवसैनिकापेक्षा कुणीही मोठं नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला आहे.”

“उद्धव ठाकरे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसह गेले होते. यातून शिवसैनिकांना भावनिकरीत्या जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आगामी महापालिका निवडणुकांत विरोधकांविरोधात लढण्यासाठी त्यांना बळ मिळावं,” असं देसाईंनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Navneet Rana Vs Shiv sena : नवनीत राणा आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी कधी पडली?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना मिळालं होतं निमंत्रण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची मंगेशकर कुटुंबियांनी शनिवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. जी निमंत्रण पत्रिका उद्धव ठाकरेंना देण्यात आली, त्यात पंतप्रधान मोदी आणि उषा मंगेशकर यांचीच नावे होती. मात्र, सरकारी प्रोटोकॉलच पालन न झाल्यानं कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला, अशीही चर्चा आहे.

नवनीत राणा, रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर मोठी गर्दी केली होती. २३ एप्रिल रोजी शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्री बाहेर जमले होते. यात ८० वर्षांच्या चंद्रभागाबाई शिंदे याही होत्या. चंद्रभागाबाई शिंदे मातोश्री बाहेर असल्याचं कळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता. त्याचबरोबर चंद्रभागाबाईंनी राणा दाम्पत्यांला ‘झुकेगा नहीं’ म्हणत आव्हान दिलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT