RSS विरोधात ED आणि IT मध्ये का करण्यात आली तक्रार? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

किरण तारे

योगेश पांडे, किरण तारे Rss अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात सक्तवसुली संचलनालय आणि इन्कम टॅक्स विभाग या दोन्ही विभागात तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ही तक्रार केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्विटर अकाऊंट हे @RSSorg या नावाने आहे. या अकाऊंटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 20 मे 2020 पर्यंत 1 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, किरण तारे

Rss अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात सक्तवसुली संचलनालय आणि इन्कम टॅक्स विभाग या दोन्ही विभागात तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ही तक्रार केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्विटर अकाऊंट हे @RSSorg या नावाने आहे. या अकाऊंटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 20 मे 2020 पर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त लोकांना रेशन किट, सात कोटी लोकांना जेवणाची पाकिटं, 27 लाख लोकांना प्रवासी श्रमिक मदत, 13 लाख इतर प्रांतातील लोकांना मदत असं सगळं दाखवलं आहे. या सगळ्यावर झालेला खर्च हा साधारण 1 हजार कोटींच्या घरात आहे. याबाबत जबलपुरे यांचं म्हणणं आहे की ज्या संस्थेचं बँक अकाऊंटही नाही आणि लॉकडाऊन मध्ये जर कुणीही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतके पैसे कुठून जमवले?

हे वाचलं का?

    follow whatsapp