महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) राज्य सरकारकडून 15 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार पुढील तीन दिवसानंतर आणखी लॉकडाऊन वाढवणार का? असा सवाल राज्यातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. खरं तर या प्रश्नाचं आजच उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की, आज (12 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडणार आहे. याच बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही? (Will lockdown increase) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. मागील लाटेच्या तुलनेत यंदा अत्यंत वेगाने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन केला आहे. आता लॉकडाऊन परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, असं असलं तरीही राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मत प्रशासनाचं आहे. कारण अद्याप रुग्णांची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही.

हे वाचलं का?

पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात लागणार कठोर लॉकडाऊन-हसन मुश्रीफ

लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण हे काही प्रमाणात कमी होत आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्याची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवू नये अशी अनेक व्यापारी संघटनांकडून देखील मागणी होत आहे. लॉकडाऊन कायम ठेवायचा असल्यास त्याचे काही नियम शिथिल करावेत अशी देखील मागणी होऊ लागली आहे. या सगळ्यावर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होऊन नेमका निर्णय घेतला जाईल.

ADVERTISEMENT

‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने सुरुवातीला काही कठोर नियम लागू केले होते. मात्र तरीही कोरोनाचे रुग्ण कमी होत नसल्याचं दिसून आल्याने सरकारने थेट संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसून येत आहे. पण असं असलं तरी काही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी सरकारला लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. (Will lockdown increase again in Maharashtra The decision will be taken today)

ADVERTISEMENT

ठाकरे सरकारने 5 एप्रिल 2021 पासून कठोर निर्बंध जारी केले होते. त्यानंतर 14 एप्रिलपासून सरकारने अत्यंत कठोर निर्बंध म्हणजे पूर्ण लॉकडाऊन 1 मेपर्यंत लागू केला होता. त्यानंतर हा लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन पुन्हा वाढणार का? याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची नेमकी स्थिती:

महाराष्ट्रात 28 फेब्रुवारीला अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77,008 इतकी होती. तेव्हा ह्या अॅक्टिव्ह रुग्णांमधे शहरी भागातील रुग्णांची संख्या जास्त होती. मुंबई 8299, ठाणे 8076 , पुणे 15005, नागपुर 10013 इतके अॅक्टिव्ह रुग्ण होते. आता म्हणजे 11 मेपर्यंत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 5 लाख 58 हजार 996 एवढी आहे. आता या वाढणाऱ्या रुग्णसंख्येत ग्रामीण महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे.

राज्यात लॉकडाऊन असताना मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये काही प्रमाणात कोरोना कमी होत आहेत. पण पुणे, चंद्रपूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये होणारी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

राज्यात गेल्या 4 महिन्यात झालेले मृत्यू पाहिले तर दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातही प्रत्येक वयोगटातील मृत्यू वाढल्याचं आरोग्य अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात राज्यात 18 हजार 959 एवढे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, पाहा कुठे-कुठे पुन्हा लागू करण्यात आला कठोर लॉकडाऊन

याआधी भारतात वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली होती. तसंच लॉकडाऊनवर भर देण्याचा सल्ला दिला होता.

मिशिगन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं. त्यांनी लॉकडाऊननंतर महाराष्ट्र आणि दिल्लीतल्या कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं म्हटलं होतं. असं असलं तरी अजूनही महाराष्ट्र, दिल्लीतला पॉझिटिव्हीटी रेट कमी झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

11 मे रोजी राज्यात 5 लाख 58 हजार 996 कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेसे होत्या थोडक्यात राज्यातली कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर त्यात फारसा परीणाम झालेला नाही. काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुणे, चंद्रपूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमधला कोरोनाचा आलेख वाढताच आहे.

  • पुणे – 97731

  • चंद्रपूर – 20081

  • सांगली – 20499

  • सातारा – 22987

  • सोलापूर – 23687

  • अहमदनगर – 26591

राज्यात लॉकडाऊन लावलेला असताना रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेत हिंगोली, इंदापूर, सोलापूर, अमरावती, सातारा, वाशिम, नाशिक, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, परभणी आणि आता कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.

लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढू शकतो कारण त्यामागील कारणं देखील तशीच आहेत.

1. गेल्या 15 दिवसांत झपाट्यानं वाढलेली रुग्णसंख्या

2. रुग्णसंख्या वाढल्यावर आरोग्य सुविधांवर येणारा ताण: रुग्णसंख्या वाढली तेव्हा राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. तसंच रुग्णालयातील बेड कमी पडू लागले.

3. लसीकरणाची कमी गती – लसीकरणावर भर देऊन जास्तीत जास्त व्यक्तींना सुरक्षित करणं आवश्यक असताना लसींचा कमी पुरवठा होत असल्याने राज्यातील लसीकरणाची गती कमी असल्याचं दिसून आलं आहे.

4. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

5. राज्यात लॉकडाऊन असतानाही सुमारे 13 जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागणं यावरुन राज्यातली कोरोनाची स्थिती गंभीरच आहे असं दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी लॉकडाऊन वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT