होळीला रस्त्यात गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात रवानगी – नागपूर पोलीसांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

होळी आणि धुलिवंदनाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. राज्य सरकारने होळीचा सण साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. नागपूर पोलिसांना यंदा दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यंदा १५ वर्षांच्या कालावधीने होळी आणि मुस्लीम बांधवांचा शब्बे बारात एकाच दिवशी येणार असल्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व घटकांनी मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या बैठकीला नागपूर पोलीस दलातील DCP, ACP आणि सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक हजर होते. तसेच या बैठकीला सर्वधर्मीय नेत्यांचीही उपस्थिती होती.

फेब्रुवारी महिन्यात शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. फेब्रुवारीत नागपूर शहरामध्ये हत्येचा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतू मार्च महिन्यात आतापर्यंत शहरात चार हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. होळी आणि शब्बे बारातचं निमीत्त साधून समाजातील काही विघातक वृत्ती यावेळी आपलं डोकं वर काढू शकतात. यावर तोडगा म्हणून आज बैठक घेण्यात आली होती.

हे वाचलं का?

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सणाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने रस्त्यात गोंधळ घातला तर त्याला थेट जेलमध्ये टाकलं जाईल असं सांगितलं आहे.

असे आहेत राज्य सरकारने होळी आणि धुलिवंदनासाठी जाहीर केलेले नियम –

ADVERTISEMENT

  • रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

ADVERTISEMENT

  • होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे

  • दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल

  • होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल

  • होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन

  • कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये

  • धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT