‘तू माझ्यासोबत…’, व्हिडिओ कॉलवर तरूणीने भुलवलं, अन् तरूण नको ते करून बसला!
Cyber Crime News: एका तरूणीसोबत अवघी काही मिनिटं बोलणं हे एका तरूणाला फारच महागात पडलं आहे. कारण यामुळे तरुणाला लाखो रुपये गमवावे लागलेच पण त्याची आता बदनामी देखील झाली आहे.
ADVERTISEMENT
Cyber Crime: नवी दिल्ली: मोबाइल हा आजकाल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. वीज बिल भरणे असो किंवा खाद्यपदार्थ मागवणे असो, प्रत्येक लहान-मोठं काम मोबाइलच्या माध्यमातून झटक्यात केलं जातं. त्यामुळे लोकांचे मोबाइलवरील अवलंबित्व प्रचंड वाढले आहे. तितकेच लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळीही ठरत आहेत. अनेक वेळा अनोळखी नंबरवरून येणारे कॉल उचलून लोक अडचणीत येत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच दिल्लीतील एक तरुण ऑनलाइन फसवणुकीचा (Cyber Crime) बळी ठरला, ज्याचा आरोप आग्रा येथील एका तरुणीवर करण्यात आला आहे. (will you romance me agra girl cheated 1.5 lakh from a young man by making a obscene video call)
ADVERTISEMENT
ऑनलाइन प्रेयसीने नको ते केलं अन्…
दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागात राहणारा 22 वर्षीय नावेद खान याच्या मोबाइलवर एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, ज्यामध्ये लिहिले होते, “तुला माझ्याशी रोमान्स करायला आवडेल का? ‘होय’ किंवा ‘नाही’ मध्ये उत्तर द्या. खानने होकारार्थी उत्तर देताच, त्याला एका मुलीने व्हिडिओ कॉल केला.. त्या मुलीने स्वत:ची ओळख आग्रा येथील रहिवासी पूजा अशी करून दिली.
अधिक वाचा- नातेवाईकासोबत अनैतिक संबंध, OYO हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत घडली भयंकर गोष्ट
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत तरुणाने म्हटले आहे की, ‘तिने तिचे कपडे उतरविण्यास सुरुवात केली आणि मला माझी पँट काढण्यास सांगितले. मी माझे कपडे पूर्णपणे काढले नाहीत, पण तिने ते रेकॉर्ड केलं. नंतर मला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला की ती माझे रेकॉर्डिंग सोशल मीडिया साइटवर टाकणार आहे.’
हे वाचलं का?
व्हॉट्सअॅप कॉलवर फसवणूक
तरुणाने सांगितले की, “मी भीतीपोटी माझ्या फोनवरून व्हॉट्सअॅप काढून टाकलं आणि सर्व सोशल मीडिया अकाउंट्सही डिलीट केले, पण दुसऱ्या दिवशी मला एका व्यक्तीचा फोन आला ज्याने मला सांगितले की तो दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचा अधिकारी आहे. त्याने सांगितले की, त्याला माझ्याविरुद्ध तक्रार मिळाली आहे, त्या आधारे तो वॉरंट जारी करणार आहे.” तक्रारीनुसार, स्वत:ची ओळख सायबर सेलचा अधिकारी म्हणून देणाऱ्या या व्यक्तीने खानला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले.
अधिक वाचा- तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
त्यामुळे नावेदने त्याच्या फोनमध्ये पुन्हा व्हॉट्सअॅप डाउनलोड केले आणि त्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला. नंतर त्या व्यक्तीने व्हिडीओ हटवण्यासाठी नावेदला मोनू पांचाळ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले.
ADVERTISEMENT
पीडित युवकाने सांगितला नेमका प्रकार
तक्रारीनुसार, नावेदने पांचाल नावाच्या व्यक्तीला फोन केला. तर त्याने या कामासाठी 21 हजार 800 रुपये मागितले. हे पैसे नंतर परत करू, असे आश्वासनही त्याने दिले. तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “जतीन कुकरेजा यांच्या नावावर असलेल्या अॅक्सिस बँकेतील खात्याचे तपशील पांचाळ यांनी मला पाठवले. त्यावर मी पैसे पाठवले, पण मला तेवढीच रक्कम तीन वेळा पाठवायला सांगितली गेली, म्हणजे एकूण 64,500 रुपये, कारण आणखी तीन व्हिडिओ हटवायचे होते. मला ही रक्कम राम गोपालच्या नावावर असलेल्या एचडीएफसी बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते.”
ADVERTISEMENT
अधिक वाचा- WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
काही वेळाने पीडित तरुणाला पांचाळ याचा पुन्हा फोन आला. याप्रकरणी सायबर सेलच्या अधिकाऱ्याला ईमेल लिहिला असून तू अधिकाऱ्याशी बोलणे आवश्यक असल्याचे पांचाळने त्याला सांगितले. नावेद म्हणाला, “मी सायबर सेलच्या अधिकाऱ्याला फोन केला तेव्हा त्याने माझ्याकडे दीड लाख रुपये अधिक मागितले. मी विनंती केल्यावर त्याने रक्कम कमी केली आणि मी त्याला पैसे दिले, पण तो पुन्हा-पुन्हा जास्त पैसे मागत राहिला.”
या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर नावेदने या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून आता सर्व आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT