Sanjay Rathod यांच्या अडचणी वाढल्या, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना त्यांचं वन मंत्रीपद गमावावं लागलं. या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर बरेच आरोप झाले. आता याच संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यात पोस्टाने पत्र पाठवून ही तक्रार करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे चित्रा वाघ यांनी?

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसंच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो असंही या तक्रारीत म्हटलं आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांचं म्हणणं काय?

ADVERTISEMENT

एक रजिस्टर पोस्टाने पोलीस स्टेशन घाटंजी येथे निनावी पत्राद्वारे अर्ज आला आहे त्यात चौकशी करून सदर अर्ज संबंधाने पुढील कारवाही करू वरिष्ठांच्या मार्गदर्शनात योग्य ती कारवाई करू आणि ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते नाव घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे मात्र अर्ज महिलेचा आहे असे घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन कराळे यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?

पूजा चव्हाण नावाच्या टीकटॉक स्टारने पुण्यातल्या महंमदवाडी भागातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर संजय राठोड आणि अरूण राठोड या दोघांच्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. संजय राठोड हे ७ फेब्रुवारीपासून पुढचे तीन आठवडे नॉट रिचेबल होते. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

यावेळी पूजाच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रही वाचून दाखवण्यात आलं होतं. पूजाच्या आई वडिलांनी यामध्ये कुठेही संजय राठोड यांचा दोष आहे असं म्हटलेलं नव्हतं. विरोधकांवर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची कारवाई केली आहे असं सांगितलं होतं. आता त्याच संजय राठोड यांच्यावर पुन्हा एकदा लैंगिक शोषण आणि शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार झाल्याचं समोर आलं आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या पत्राला ट्विटमधून वाचा फोडली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT