धक्कादायक घटना! कुंड्या चोरल्याच्या कारणावरून दोन मुलांसह आईला लाठीने मारहाण, काढली धिंड
–इम्तियाज मुजावर, सातारा फुलांच्या कुंड्या चोरल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने बेदम करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सगळं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलं आहे. धिंड काढणाऱ्या महिला पोलिसाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सविता आगम असे गुन्हा दाखल झालेल्या […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
फुलांच्या कुंड्या चोरल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने बेदम करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सगळं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलं आहे. धिंड काढणाऱ्या महिला पोलिसाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सविता आगम असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस महिलेचं नाव आहे.
अधिक माहिती अशी की, गुरुवार (16 डिसेंबर) फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांनी फलटण शहरातील दत्तनगर येथील एका घरात घुसून दोन अल्पवयीन मुलं व त्यांच्या आईला काठीने वळ उमटेपर्यंत मारहाण केली.
लहान मुलांनी आणलेल्या फुलांच्या झाडाच्या कुंड्या डोक्यावर घेऊन आई व मुलांची महिला पोलीस कर्मचारी आगम यांनी स्वतःच्या घरापर्यंत शिवीगाळ करत धिंडही काढली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे तक्रार केली. तसेच कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, सिकंदर डांगे, संजय पवार, ताजुद्दीन बागवान यांनी दिला होता.
