मला आशा आहे की माझा मुलगा लवकर घरी येईल; शाहरुखचा NCB अधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज अभिनेता शाहरूख खानने आपला मुलगा आर्यन खान याची आर्थर रोड तुरुंगात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्याने NCB च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शाहरुख खान आणि आर्यन खान यांची भेट पंधरा मिनिटांसाठी झाली. सकाळी ऑर्थर रोड तुरुंगात पोहोचल्यानंतर शाहरुख खान आणि आर्यनला भेटीच्या कक्षात नेण्यात आलं. दोघे समोरासमोर असले तरी दोघांच्यामधे काचेची भिंत होती. त्यामुळे दोघंही एकमेकांना फक्त बघू शकले. त्याचबरोबर इंटरकॉम फोनवरून शाहरुखने आर्यनची चौकशी केली.

काय म्हणाला शाहरुख खान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या भेटीनंतर शाहरुख एनसीबीचे अधिकारी शाहरुखच्या घरी गेले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना शाहरुख म्हणाला की तुम्ही खूप चांगलं काम करत आहात पण मला आशा आहे की माझा आर्यन लवकर बाहेर येईल. आज एनसीबीचं एक पथक शाहरुखच्या घरी गेलं होतं. सूत्रांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग पार्टी होणार होती. ही पार्टी एनसीबीने उधळून लावली. अशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आर्यन खानला जामीन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याला जामीन मिळू शकलेला नाही.

ADVERTISEMENT

Exclusive : आर्यन खान जामीन न मिळाल्याने प्रचंड नाराज, बराकीत गेला आणि…

ADVERTISEMENT

बुधवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला. यानंतर आर्यनच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली.

परंतू हायकोर्टातही आर्यन खानला लगेच दिलासा मिळालेला नाहीये. मुंबई हायकोर्ट २६ ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे. आर्यनच्या वकीलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्याची विनंती हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच रहावं लागणार आहे. २६ तारखेला मुंबई हायकोर्टात जस्टीस एन.डब्ल्यू.सांबरे यांच्यासमोर आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दल माहिती दिली.

१४ तारखेला मुंबईच्या विशेष NDPS कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. २० तारखेच्या सुनावणीत आर्यनला जामीन मिळेल अशी सर्वांनाच आशा होती. परंतू निकाल देताना कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे २६ तारखेला हायकोर्टासमोर सुनावणीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT