लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही का? हायकोर्टाचा नवाब मलिकांना प्रश्न

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्याव उत्तर द्या असे निर्देश बॉम्बे हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना दिले होते. आजच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक यांना हायकोर्टाने प्रश्न विचारला आहे. समीर वानखेडे यांच्यावरिोधात ट्विटरवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली का? असा प्रश्न कोर्टाने मलिक यांना विचारला आहे. नवाब मलिक यांनी आता अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर ज्ञानेश्वर वानखेडे यांना ट्विट खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर कऱण्याचे निर्देश दिले आहेत.

ADVERTISEMENT

‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम’ नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं उत्तर

समीर वानखेडे यांच्यासोबत वाद असताना त्यांची बहीण, मेहुणी, यांच्यावर आरोप करण्याचं कारण काय? यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे असा दावा वानखेडेंच्या बाजूने करण्यात आली. त्याबाबत तुमचा मुलगा सरकारी नोकरीते आहे. त्यावेळी सवाल उठणारच तुम्ही हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करा असं कोर्टाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि काही फोटो शेअर केले होते जे आधीच जाहीर झाले होते ते फक्त पुन्हा पोस्ट केले असं मलिक यांच्यातर्फे कोर्टात सांगितलं गेलं. त्यावेळी कोर्टाने प्रश्न विचारला की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट कताना त्याची सत्यता पडताळून पाहिलीत का? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे. लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून तुमची जबाबदारी नाही का? असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे. ज्यानंतर आपल्याला जी माहिती आहे ती खरी आहे असा दावा मलिक यांच्यातर्फे करण्यात आला.

ADVERTISEMENT

हायकोर्टाने ज्ञानेश्वर वानखेडे आणि नवाब मलिक या दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिकांना जाहीर केलेली माहिती खरी आहे स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर वानखेडेंना हे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी शुक्रवारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT