एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बायकांसोबत राहतो तरुण, प्रत्येकी सोबत रोमान्स करण्यासाठी वेळही ठरलेली!
Man Living With 8 Wives: एकाच घरात 8 बायकांसह राहणाऱ्या पुरुषाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओंग डॅम सोरोट (Ong Dam Sorot)असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा थायलंडचा (Thailand) आहे. सोरोट हा प्रत्येक पत्नीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता. Tattoo आर्टिस्ट असणाऱ्या सोरोट याला तब्बल 1-2 नव्हे तर 8 बायका (Artist Eight Wives) […]
ADVERTISEMENT

Man Living With 8 Wives: एकाच घरात 8 बायकांसह राहणाऱ्या पुरुषाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओंग डॅम सोरोट (Ong Dam Sorot)असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा थायलंडचा (Thailand) आहे. सोरोट हा प्रत्येक पत्नीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता.
Tattoo आर्टिस्ट असणाऱ्या सोरोट याला तब्बल 1-2 नव्हे तर 8 बायका (Artist Eight Wives) आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या सर्व बायका एकाच घरात ते देखील अगदी गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. त्या सगळ्याच जणी या ओंग डॅम सोरोटवर खूप प्रेम करतात आणि त्याला जगातील सर्वात सभ्य माणूस मानतात.
सोरोट याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘त्याच्या बायका चार स्वतंत्र बेडरूममध्ये झोपतात आणि त्यामुळे प्रत्येक पत्नी आपली वेळ कधी येईल याची आतुरतेने वाट पाहते.’
Oddity Central च्या मते, टॅटू आर्टिस्ट सोरोट एका टीव्ही शोमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. टीव्ही शोवरील मुलाखती दरम्यान, त्याने सांगितले होते की त्याच्या आठही बायका या एकमेकींशी खूप चांगल्या पद्धतीने वागतात आणि त्या सर्व सुसंवादी असून कौटुंबिक संबंध जपणाऱ्या आहेत.’ सोरोटच्या या एका इंटरव्ह्यूला फक्त यूट्यूबवर 30 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.