राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार, बनसोडे थोडक्यात बचावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. पुण्याजवळच्या पिंपरीत ही घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 2:30 च्या सुमारास बनसोडे जेव्हा आपल्या चिंचवड येथील कार्यालयात होते तेव्हा त्यांच्या ओळखीचा तानाजी पवार नामक व्यक्ति तेथे आला त्यानंतर एका विषयावरून आमदार बनसोडे आणि पवार यांच्यात वाद झाला. त्यानंतर तानाजी पवार याने आपल्याजवळचे रिव्हॉल्वरर काढले आणि बनसोडेंवर दोन गोळ्या झाडल्या त्या चुकल्याने बनसोडे बचावले. तानाजी तिसरी गोळी झाडणार होता त्याचवेळी बनसोडेंच्या अंगरक्षकांनी त्याला पकडलं.

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गोळीबार करणाऱ्या तानाजी पवारला ताब्यात घेतले. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाची हत्या करून तरूणाची आत्महत्या

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? बनसोडेंनी सांगितला घटनाक्रम

गोळीबाराविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, ‘अँथनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतो आहे. त्याचा तानाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली, तेवढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं’ असं आमदार बनसोडे म्हणाले.

ADVERTISEMENT

मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

ADVERTISEMENT

‘कोणतीही वादावादी झाली नाही. त्याने वाद घातला. मग माझ्या कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्यांनी ते बघितलं. त्यांनी त्याला शिवीगाळ केली. त्याने गोळीबार केल्यानंतर मुलांनी त्याला धक्का देऊन खाली पाडलं. नंतर त्याला मारहाण केली. तोपर्यंत त्याने दोन फैरी झाडल्या होत्या. पहिली गोळी माझ्या दिशेनं झाडली. पण, एका मुलाने धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली. त्याला कुणी पाठवलं होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. कचऱ्याचा कंत्राटदार जर पिस्तूल बाळगणारे सुपरवायझर ठेवत असेल, तर कसं व्हायचं’ असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून, फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जेव्हा अजित पवारांनी भाजपासोबत युती केली होती, तेव्हा आमदार अण्णा बनसोडे यांनीही त्यांना पाठिंबा दिलेला होता. अजित पवार यांचे ते विश्वासू आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT